Aishwarya Rai | ‘…मला खूप सहन करावं लागलं’; अभिषेक बच्चनचा सर्वात मोठा खुलासा!

Aishwarya Rai | बाॅलिवूडची सौंदर्यवती ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांच्या नात्याबदल गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. अशात अभिषेकने दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यात त्याने मोठा खुलासा केलाय.

काय आहे प्रकरण?

अभिषेक बच्चनने मुलाखतीमध्ये त्याच्या करियर विषयी मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने ऐश्वर्याबदल (Aishwarya Rai) नाही तर वडिल अमिताभ बच्चन यांच्याबदल सांगितल आहे. बोलत असताना अभिषेक म्हणाला की, फक्त मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे म्हणून मला कोणीही काम दिलं नाही.

पुढे काय म्हणाला?

अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने सर्वांनाच माझ्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, माझे वडिल अमिताभ बच्चन स्वतः सिनेसृष्टित होते आणि म्हणून मला जास्त चित्रपटात काम मिळालं नाही. मी कोणत्याही चित्रपट निर्मात्याला भेटायला गेलो की, ते मला अत्यंत प्रेमाने चित्रपटासाठी नकार देत असत.

अभिषेक म्हणाला की, मला लाईफमध्ये मला खूप स्ट्रगल करावा लागलाय. अनेक चित्रपटात मला काम करायची इच्छा होती मात्र, कोणताही चित्रपट निर्माता मला चित्रपटामध्ये काम देऊ इच्छित नव्हता. एक स्क्रिप्ट मला भेटली पण त्यासाठी माझ्या वडिलांनी नकार दिला.

वडिलांसोबत माझी तुलना-

एवढंच नाही तर अभिषेक म्हणाला की, अमिताभ यांच्यासोबत देखील माझी बरोबरी केली जात होती, त्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टी या सहन कराव्या लागल्या आहेत. कोणताच चित्रपट निर्माता मला लॉन्च करू इच्छित नव्हता. कारण मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा होतो.

मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनला त्याच्या नात्याबदल विचारण्यात आलं होतं. अभिषेकला घटस्फोटाबदल वारंवार विचारलं जात होतं. मात्र, सध्या तरी या दोघांनी यावर भाष्य केलेलं नाहीये.

News Title : Aishwarya Rai Abhishek Bachchan’s biggest revelation

थोडक्यात बातम्या –

Raj Thackeray | राज ठाकरे भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदेंना साथ देणार?, सहाव्या भेटीबाबत महत्त्वाची माहिती

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण

Aishwarya Rai च्या ‘या’ चित्रपटांनी लावलं जगाला वेड, एकदा तरी आवर्जुन पहायला हवेत असे चित्रपट!

Investment Tips | 25 व्या वर्षी ‘या’ 4 गोष्टी नक्की करा, भविष्यात कधीच भासणार नाही पैशांची कमी