Investment Tips | 25 व्या वर्षी ‘या’ 4 गोष्टी नक्की करा, भविष्यात कधीच भासणार नाही पैशांची कमी

Investment Tips | आयुष्यात पैसे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या गरजा, आपला आनंद सगळं काही पैशांवर अवलंबून आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठीही आपल्याला पैसे लागतातच. पैशांचं योग्य नियोजन करता आलं नाहीतर आयुष्यात बऱ्याच समस्या येतात.

Investment Tips | ‘या’ 4 गोष्टी नक्की करा

भविष्यात कोणती अडचण कधी येईल हे सांगणं कठिण आहे. पण आपल्याकडे बचत असेल आणि आपण त्यावेळी पैसे उभे करू शकू तर आपल्याला जास्त चिंता वाटणार नाही. यासाठी पैसे गुंतवणं खूप महत्त्वाचं आहे. कमावलेल्या पैशांचं योग्य नियोजन करून आलेला पैसा दुप्पट करून तुम्ही बचत शकता. आपण जितक्या लवकर गंतवणूक सुरू करू त्याचा तितका जास्त फायदा आपल्याला होतो.

वय नेहमीच वाढतं ते कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी सुरू केल्या तर फायदेशीर ठरतील.

इनकम– प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. अशा परिस्थितीत, लवकर कमाई सुरू करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 25 वर्षांचे व्हाल तोपर्यंत तुम्ही उत्पन्नाचा स्रोत तयार केला पाहिजे.

तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवत असाल, तुमचे उत्पन्न सुरू होणं महत्त्वाचं आहे. जितक्या लवकर तुमची कमाई सुरू होईल तितक्या लवकर तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात कराल आणि श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल कराल.

बचत– कमाई सुरू करताच बचतीलाही महत्त्व दिलं पाहिजे. दरमहा तुमच्या कमाईचा काही भाग वाचवा. बचतीच्या माध्यमातून तुम्ही बचतीला प्राधान्य द्याल आणि चांगली रक्कम वाचवण्यास सुरुवात कराल. बचतीद्वारे, तुम्हाला पैसे वाचवण्याची सवय देखील विकसित होईल, ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्चापासूनही वाचता येईल.

गुंतवणूक | तुम्ही बचत करत असलेले पैसे गुंतवायला सुरुवात करा. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी तुमचे पैसे गुंतवायला सुरुवात केली, तर तुम्हाला या गुंतवणुकीतून दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही नियमित गुंतवणूक करून लवकर श्रीमंत होऊ शकता.

विमा | तुम्ही तुमचा लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स वयाच्या 25 व्या वर्षी काढला पाहिजे. लहान वयातच जीवन विमा करून घेतल्यास, प्रीमियमची रक्कम कमी असेल आणि परतावाही जास्त असेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण

Aishwarya Rai च्या ‘या’ चित्रपटांनी लावलं जगाला वेड, एकदा तरी आवर्जुन पहायला हवेत असे चित्रपट!

JN1 Varient | वाढत्या कोरोनामुळे सरकार अलर्ट मोडवर; उचललं मोठं पाऊल!

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

Post Office Scheme | नवरा-बायकोसाठी पोस्टाची जबरदस्त योजना; 5 वर्षात जमतील ‘इतके’ लाख रूपये