JN1 Varient | वाढत्या कोरोनामुळे सरकार अलर्ट मोडवर; उचललं मोठं पाऊल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

JN1 Varient | कोरोनाचा नवा JN1 Varient देशभरात आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केरळमध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकार आता अॅक्शन मोडवर आलं आहे.

JN1 Varient | सरकारने घेतला मोठा निर्णय

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य संकट लक्षात घेता राज्य सरकारने नव्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे. आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात आली आहे.

या टास्कफोर्समध्ये दिल्ली आय.सी.एम.आर.चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर, एम.यु.एच.एस. नाशिकच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानीटकर, पुण्याचे बी. जे. मेडीकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकते, नवले मेडीकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार, पुण्याच्या नवले मेडीकल कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम यांच्यासह आणखी काही दिग्गज डॉक्टरांचा समावेश आहे.

“अजिबात घाबरु नका”

दरम्यान, कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर देशभरात हाहाकार उडाला होता, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या व्हेरियंटचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली, त्यानंतर राज्याच्या इतर भागातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याचं समोर येत आहे.

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, मात्र या व्हेरियंटची लागण झाली तरी अजिबात घाबरु नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. या आजाराचा रुग्ण एका आठवड्यात बरा होतो, त्यामुळे घाबरुन जाऊ नये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारी व्यक्तींनी घरीच राहण्याच्या सूचना ही डॉक्टरांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

Post Office Scheme | नवरा-बायकोसाठी पोस्टाची जबरदस्त योजना; 5 वर्षात जमतील ‘इतके’ लाख रूपये

Pune Gas Cylinder Blast | मोठी बातमी! पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट

Ram Mandir | जमीन विकून दिली होती ‘इतक्या’ कोटींची देणगी; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फायदाच फायदा