Ram Mandir | जमीन विकून दिली होती ‘इतक्या’ कोटींची देणगी; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | जगभरात श्रीरामाचे करोडो भक्त आहेत. एका रामासाठी, रामनामासाठी लोकं काय काय करतात. याचा प्रत्यय उत्तर प्रदेशात आलं. 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. त्यासाठी कोट्यवधी हात मदतीसाठी पुढे आले. असाच एक पुढे आलेला हात होता, सियाराम गुप्तांचा….

Ram Mandir | राम मंदिरासाठी जमीन विकली

सियाराम गुप्ता यांनी श्रीराम मंदिरासंदर्भात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी देणगी दिली होती. 2018 मध्ये त्यांनी एक कोटी रुपये दिले होते. त्यासाठी त्यांनी आपली जमीन विकली. त्यातून 85 लाख रुपये मिळाले. त्यानंतर एक कोटी रुपये जमले नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतले आणि एक कोटीची देगणी दिली. या देणगीचा कुठेही प्रचार केला नाही.

रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या नोंदीनुसार ते पहिले देणगीदार ठरले असून त्यांना रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रण दिलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये राहणारे सियाराम गुप्ता या रामभक्ताला राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण दिले गेलं आहे. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवार आनंदीत झाला आहे.

पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

सियाराम गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ऑक्टोंबर 2018 मध्ये एक कोटी रुपयांचा धनादेश राष्ट्रीय स्वयसंवेक संघाच्या काशी प्रांताकडे दिला होता. नोंदीनुसार ते राम मंदिरासाठी देगणी देणारे पहिले देणगीदार आहेत.

अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. सर्वत्र प्रभू रामाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक जण अयोध्येकडे रवाना होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Salman Khan Net Worth | सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Aishwarya Rai | अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘ऐश्वर्यामुळे माझ्या लेकीची”

Jio ची बंपर ऑफर!, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

Electronic Soil | शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Jacqueline Fernandez | ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का?’; तिहारमधून सुकेशची जॅकलिनला थेट धमकी