Aishwarya Rai | अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘ऐश्वर्यामुळे माझ्या लेकीची”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांना बॉलिवूडचे पॉवर कपल म्हटलं जातं. दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यामध्ये सध्या वाद सुरु असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे.

अभिषेक बच्चनचं मोठं वक्तव्य

दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच असं सांगण्यात आलं की, ऐश्वर्या रायने सासरचे घर सोडलं आहे आणि ती तिच्या आईच्या घरी राहू लागली आहे. पण दरम्यान आराध्याच्या शाळेच्या फंक्शनमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले. तिथून बाहेर पडताना त्याने पापाराझींसमोरही जोरदार पोझ दिली. अशात अशात अभिषेकने एक मोठं वक्तव्य केलंय.

मुलाखतीत अभिषेक याला विचारण्यात आलं की, आराध्या हिच्या चांगल्या संस्काराचं श्रेय कोणाला देशील? ज्यावर अभिषेक याने पत्नी ऐश्वर्या हिचं कौतुक केलं आणि मुलीची चांगली काळजी घेतल्याचं श्रेयही ऐश्वर्या हिला दिलं.

माझ्या मुलीची काळजी घेण्याचे श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. मी जेव्हाही चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जातो तेव्हा ती आमच्या मुलीची पूर्ण काळजी घेते, असं अभिषेकने सांगितलं.

“Aishwarya मुळे आराध्याची वागणूक…”

ऐश्वर्या हिच्यामुळे आराध्या हिची वागणूक उत्तम आहे. ऐश्वर्या आणि मी आराध्या हिला फक्त एक चांगली व्यक्ती कशी घडवता यईल यासाठी प्रयत्न करत असतो, असं अभिषेकने सांगितलं.

दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न केलं होतं. आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं सांगितलं जातंय. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

Jio ची बंपर ऑफर!, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

Electronic Soil | शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Jacqueline Fernandez | ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का?’; तिहारमधून सुकेशची जॅकलिनला थेट धमकी

Mahindra | ‘या’ कारचा बाजारात धुमाकूळ; विक्रीचे मोडले सगळे रेकॉर्ड

Death Predictor | वैज्ञानिकांचा नवा शोध, माणसाच्या मृत्यूची वेळ आणि तारीख समजू शकणार!