Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण

Salman Khan | बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तो चित्रपटांमध्ये किसिंग सीन का करत नाही, यामागचं कारण नमेकं काय आहे?.

“…म्हणून मी एकही किसिंग सीन दिला नाही”

सलमान खानचा एक डायलॉग आहे, एकदा कमिटमेंट दिली तर माझंही ऐकत नाही. हा डायलॉग सलमान खानवर पूर्णपणे सूट करतो कारण, त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने आजपर्यंत नो किसिंग पॉलिसी पाळली आहे.

फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी सलमान खानने ठरवलं होतं की, तो चित्रपटांमध्ये लिपलॉक सीन्स करणार नाही. त्याच्या चित्रपटात जेव्हा जेव्हा किंसिंग सीन दाखवले गेले तेव्हा एकतर कॅमेरा अँगल बदलला जातो किंवा अशी काही व्यवस्था केली गेली की ती प्रेक्षकांना रोमँटिक वाटेल.

Salman ची नो किसिंग पॉलिसी

सलमान खानने आजपर्यंत आपली नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे. यामागचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे. सलमान खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, लहानपणी आम्ही कुटुंबासोबत इंग्रजी चित्रपट पाहायचो, पण जेव्हा कधी किसिंग सीन यायचा तेव्हा सगळेच अस्वस्थ व्हायचे. सलमान पुढे म्हणाला, माझा चित्रपट पाहताना माझ्या चाहत्यांना असे वाटू नये असं मला वाटतं.

आपल्या नो किसिंग पॉलिसीबाबत सलमान खान पुढे म्हणाला की, मी नेहमीच कुटुंबासाठी चित्रपट बनवतो. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र चित्रपट पाहतं तेव्हा मला ते आवडतं, म्हणून मी किंसिंग सीन करत नाही जेणेकरून चित्रपट पाहताना अस्वस्थ होऊ नये.

मैंने प्यार किया या चित्रपटातील सलमान खान आणि भाग्यश्रीचे किसिंग सीन शूट करण्यासाठी मध्यभागी एक आरसा लावण्यात आला होता. याशिवाय राधे चित्रपटातील किसिंग सीन दरम्यान अभिनेत्री दिशा पटानीच्या तोंडावर टेप लावण्यात आला होता, त्यानंतर हा इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune Gas Cylinder Blast | मोठी बातमी! पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट

Ram Mandir | जमीन विकून दिली होती ‘इतक्या’ कोटींची देणगी; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फायदाच फायदा

Salman Khan Net Worth | सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Aishwarya Rai | अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘ऐश्वर्यामुळे माझ्या लेकीची”