Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड (Mutual Funds) फोलिओमध्ये नॉमिनी अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे काम करण्यासाठी गुंतवणूकदारांना 30 जून 2024 पर्यंत वेळ आहे. यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत होती.
Mutual Funds | नॉमिनी अपडेट 30 जूनपर्यंत करता येणार
आतापर्यंत लाभार्थीचे नामांकन करण्याची किंवा घोषणापत्र सादर करून निवड रद्द करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या या हालचालीचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित करण्यात आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना सुपूर्द करण्यात मदत करणं आहे.
बाजारातील सहभागींकडून प्राप्त झालेले अर्ज पाहता, अनुपालन सुलभतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी, डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड फोलिओसाठी ‘चॉइस ऑफ नॉमिनेशन’ सबमिट करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासह, SEBI ने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs), डिपॉझिटरी सहभागी आणि रजिस्ट्रार आणि हस्तांतरण एजंट (RTAs) यांना डीमॅट खातेधारक आणि म्युच्युअल फंड युनिट धारकांना दर पंधरवड्याला ईमेल किंवा एसएमएस पाठवून नोंदणी किंवा निवड रद्द करण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितलं आहे.
Mutual Funds म्हणजे काय?
म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणूक (Investment) करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय आहे. मात्र, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेऊ.
म्युच्युअल फंड हा सामूहिक गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहिला जातो. जेव्हा बरेच लोक थोडे-थोडे पैसे जमा करुन एखाद्या मॅनेजमेंट कंपनीला आपल्याऐऐवजी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी देतात त्याला म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणतात. म्युच्युअल फंड कंपन्या किरकोळ गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा करतात. त्यानंतर हे पैसे शेअर्समध्ये गुंतवतात. त्या बदल्यात म्युच्युअल फंड कंपन्यादेखील गुंतवणुकदारांकडून फीज घेतात.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?
Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!
Entertainment News | ‘या’ बड्या अभिनेत्याची हत्या?; दिग्दर्शकाच्या पोस्टमुळे एकच खळबळ