मुंबई | नोटाबंदीनंतर, UPI पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे, UPI पेमेंटच्या आगमनाने दैनंदिन वस्तू खरेदी करणे आणि बिल पेमेंट करणे खूप सोपे झालं आहे. पण तरीही असे अनेक लोक आहेत ज्यांनी UPI आयडी बनवला आहे पण कधीही UPI पेमेंट केलं नाही. आता 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत, नवीन नियमांनुसार, NPCI ज्यांनी गेल्या एका वर्षात एकही UPI व्यवहार केला नाही त्यांचा UPI आयडी ब्लॉक करेल.
Paytm-Gpay ची UPI आयडी होईल ब्लॉक
NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, आता सर्व बँका आणि Paytm, PhonePe, Google Pay सारख्या तृतीय पक्ष अॅप्स त्या UPI आयडी निष्क्रिय करतील ज्यात गेल्या 1 वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही.
तुमचा UPI आयडी निष्क्रिय किंवा ब्लॉक होण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा तुमच्या मोबाइल नंबरवर संदेशाद्वारे कळवलं जाईल. तुमचा UPI आयडी कोणत्या तारखेपासून ब्लॉक केला जाईल हे मेसेजद्वारे सांगण्यात येत आहे.
UPI आयडी ब्लॉक होण्यापासून वाचवा
हा मेसेज पाठवण्यामागचा उद्देश अशा लोकांना अपडेट करणे हा आहे ज्यांनी UPI आयडी बनवला आहे पण गेल्या एका वर्षात कोणताही व्यवहार केलेला नाही. तुमचा UPI आयडी बंद होणार आहे असा मेसेज किंवा ईमेलद्वारे तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करावं लागेल, तुम्ही फक्त UPI पेमेंट केलं तरी तुमचा UPI आयडी ब्लॉक होणार नाही. जर तुम्ही UPI पेमेंट केलं नाही आणि तुमचा UPI आयडी ब्लॉक झाला असेल तर तुम्हाला नंतर खूप त्रास होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”
Team India: बायकांमुळे झाले बरबाद!, नाहीतर आज असते सचिन-कोहलीपेक्षा मोठे स्टार!
Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!
तुमच्या फोनमध्ये ‘हे’ Android Apps असतील तर आत्ताच हटवा!, गुगलने केली मोठी कारवाई
Weather Update | ऐन थर्टी फर्स्टला ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा