Satara Loksabha | साताऱ्यात नुकतीच महाविकास आघाडीची सभा झाली. त्यासभेमध्ये मराठी अभिनेत्रीने आपल्या भाषणाने साताऱ्याची सभा गाजवली आहे. राज्यातच नाहीतर देशाच्या पातळीवर अभिनेते, अभिनेत्री राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. नुकतंच शिंदे गटाच्या शिवसेनेत अभिनेता गोविंदाने प्रवेश केला. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना राणौतला मंडीतून उमेदवारी देण्यात आली. अशातच आता सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने भाषण करत सरकारवर हल्ला केला आहे. (Satara Loksabha)
अश्विनी महांगडे या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून लोकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. अश्विनी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली होती. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टने ती राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता अश्विनीने आपल्या हाती शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा आपल्या हाती घेतला आहे. अश्विनीने साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या भाषणात अनेक मुद्दे मांडले आणि सरकारच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
“आपला उमेदवार विजयी झालेला आहे”
अश्विनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भाषणाची सुरूवात केली. आज आपल्या तुतारीचा आवाज जसा घुमलाय तशी मला खात्री झालेली आहे आपला उमेदवार विजयी झालेला आहे. लढवय्यांचा सातारा, शूरवीरांचा सातारा, देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा सातारा, कलाकारांचं माहेरघर सातारा पण इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा उघडली जातील तेव्हा तेव्हा सुवर्णाक्षरांनी एकच शब्द लिहिला जाईल आणि तो वाचला जाईल ते म्हणजे निष्ठावंतांचा सातारा. याच साताऱ्यात आम्हाला पवार साहेबांनी निष्ठावान नेता दिला आहे, असं अश्विनीने म्हटलं. त्यानंतर अश्विनीने पवार साहेबांचे आभार मानले आहेत.
भाषण करत असताना अश्विनीने भाषणादरम्यान ‘एक तुतारी द्या मज आणूनी फुंकीन जी मी स्वप्रणानाने, भेदून टाकीन सगळी गगने अशी तुतारी द्या मजला आणूनी’ कविता सादर केली. त्यानंतर त्या म्हणाल्या की ही तुतारी ज्या माणसाच्या हातात दिलीये की माणूस अत्यंत निष्ठावंत आह, असं म्हटलं. त्यानंतर अश्विनीने आपल्या हातात शरद पवार यांच्या पक्षाचा झेंडा घेतला आणि शेतकऱ्याचं आणि शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं. तसेच अश्विनीचे वडील हे अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे कार्यकर्ते असल्याचं अश्विनीने भरसभेत सांगितलं.
“झेंडा हाती घेताना अभिमान वाटला”
पुढे ती म्हणाली “शेतकऱ्यांना विचारतं कोण फक्त शरद पवारसाहेबच. माझे वडील शेवटपर्यंत साहेबांचंच काम करत होते. त्यामुळे मी त्यांचा झेंडा हाती घेताना मला अभिमान वाटत आहे. कुठेतरी माझ्या वडिलांचं स्वप्न होतं त्यासाठी मी पाऊल टाकलं आहे. ही निवडणूक देशाची आहे असं बोललं जात आहे मग प्रश्नही तसेच पडायला हवे
माजी पंतप्रधान मनमोहनसिंह जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा देशाचं कर्ज हे 58.5 लक्ष कोटी कर्ज होतं. तर ते कार्ज आज 155 कोटी लक्षावर गेलंय. असं म्हणत अश्विनीनं सरकारवरही निशाणा साधला आहे. शेतकऱ्याला हामीभाव, भ्रष्टाचार, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला खेळाडूंवर जे काही राजकारण झालं त्यानं मन दुखावलं गेलंय”, असं म्हणत अश्विनीने भाषणाच्या अंतिम टप्प्यात शशिकांत शिंदे यांना विजयी करण्याचं उपस्थितांना आवाहन केलंय.
News Title – Satara Loksabha Actress Ashwini Mahangade Pakshpravesh At Sharad Pawar NCP Full Speech
महत्त्वाच्या बातम्या
अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह
राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका
MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!
भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार