Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं आज अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मोदी अयोध्या विमानतळावर उतरताच हजारो लोकांनी एकाच वेळी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू झाला. अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत हा रोड शो सुरू होता. हजारो लोकं या रोड शोमध्ये सामील झाले होते.
आवाहन

Ram Mandir | नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. तसेच नव्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवून जनतेला मोठं गिफ्ट दिलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं केलं आहे.

“22 जानेवारीला घरा घरात दिवे लावा”

येत्या 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची जगाला प्रतिक्षा आहे. अयोध्यातील जनतेचा उत्साह स्वाभाविक आहे. 22 जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करा. घरा घरात दिवे लावून घर उजळून टाका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी 22 जानेवारीला घराघरात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे.

संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगात अयोध्येच्या नागरिकांमध्ये उत्साह असणं हे स्वाभाविक आहे. भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि जनाचा मी पुजारी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच उत्सुक आहे, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

महत्त्वाची बातमी- 1 जानेवारीपासून तुमच्या Paytm-Gpayची UPI आयडी होऊ शकते बंद

Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”

Team India: बायकांमुळे झाले बरबाद!, नाहीतर आज असते सचिन-कोहलीपेक्षा मोठे स्टार!

Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!

तुमच्या फोनमध्ये ‘हे’ Android Apps असतील तर आत्ताच हटवा!, गुगलने केली मोठी कारवाई