Viral News | पप्पी घेतली, पदर खेचला, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबतचे मुख्याध्यापिकेचे नको ते चाळे व्हायरल

Viral News | शाळा हे विद्येचं मंदीर मानलं जातं आणि शिक्षकांना गुरु मानलं जातं, मात्र याच शिक्षेचं मंदीर मानलं जाणाऱ्या शाळेत शिक्षकांकडून नको ते कृत्य होत असेल तर करायचं काय?, असा प्रश्न अनेकदा पालकांना पडतो. आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे. इथं व्हायरल होण्यासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. शिक्षकांमध्येही हे फॅड पसरल्याचं दिसून येतंय, त्यातूनच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका शाळेतील शिक्षिकेनं आपल्या विद्यार्थ्यासोबत असं काही कृत्य केलं की या कृत्याचा व्हिडीओ थेट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या कृत्यामुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकला असून या प्रकाराची देशभरात एकच चर्चा होताना पहायला मिळत आहे.

काय आहे नेमका प्रकार?

कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथे मुरुगमल्ला या गावातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या गावातील मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. यामध्ये दहावीच्या विद्यार्थांचा सहभाग होता. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता यांनी दहावीच्या वर्गातील एका विद्यार्थासोबत रोमँटिक (Viral News) फोटोशूट केलं.

काय घडलं नेमकं?

कर्नाटकमधील मुरुगमल्ला गावातील शाळेच्या एजुकेशनल ट्रीप दरम्यान इथल्या मुख्याध्यापिकेने आणि विद्यार्थ्याने रोमँटिक (Viral News) फोटोशूट केले. त्यांचे हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या ट्रीपमध्ये स्कूलचा स्टाफही सोबत होता.

X / ?

या फोटोंमध्ये विद्यार्थी मुख्याध्यापिकेला मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोंमध्ये विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेला थेट उचलून देखील घेतल्याचं पहायला मिळत आहे. शिवाय पुढे तो त्यांच्या साडीचा पदर खेचतानाही काही फोटो पहायला मिळत आहे. ट्रीप दरम्यान एका दुसऱ्या विद्यार्थ्याने हे फोटोशूट केले आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप-

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, शिवाय मुख्याध्यापिकेला देखील नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.

रोमँटिक फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना धक्का बसलाय. त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली. याची तक्रार त्यांनी ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्याकडे केली आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title : Viral news principal students romantic photo viral

थोडक्यात बातम्या –

Maharashtra | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

SBI ने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी!

Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

महत्त्वाची बातमी- 1 जानेवारीपासून तुमच्या Paytm-Gpayची UPI आयडी होऊ शकते बंद

Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”