1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 1 जानेवारी 2024 पासून पैशांशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यातील अनेक बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील, तर काही तुम्हाला अडचणीतही टाकू शकतात. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत, लहान बचत योजनांवरील व्याज, डीए, आयटीआर, बँक लॉकर आणि UPI आयडी यांच्याशी संबंधित बदलांचा समावेश आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल

आर्थिक वर्ष 2022-23 साठी विलंबित किंवा सुधारित आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत फाईल करा.

तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर दाखल करू शकणार नाही. अशा परिस्थितीत आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत तुम्ही ITR दाखल न केल्यास तुरुंगातही जाऊ शकता.

एलपीजी सिलेंडर स्वस्त मिळणार

राजस्थानमधील उज्ज्वला लाभार्थ्यांना 1 जानेवारीपासून स्वस्त एलपीजी सिलेंडर मिळणार आहे. या लोकांना LPG सिलेंडर फक्त 450 रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे. त्याचबरोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्याही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर ठरवतात. याचा परिणाम देशभरातील ग्राहकांवर होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मिळेल

केंद्र सरकारने अलीकडेच चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीसाठी छोट्या बचत योजनांवर व्याजदर जाहीर केले आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 0.20 टक्के वाढ करण्यात आली आहे.

3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल नाही. अशा प्रकारे 1 जानेवारीपासून सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.1 टक्के व्याजदर असेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी

Viral News | पप्पी घेतली, पदर खेचला, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबतचे मुख्याध्यापिकेचे नको ते चाळे व्हायरल

Maharashtra | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

SBI ने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी!

Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन