Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराचा शुभारंभ झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या बैठकीत मात्र आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अनुपस्थित होते. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि रोहित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद असल्यानेच त्यांनी या शिबिराला दांडी मारल्याचं म्हटलं जात आहे. 

रोहित पवार अन् Jayant Patil यांच्यात वाद?

रोहित पवारांसोबत वाद झाल्याच्या चर्चांवर जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार सध्या विदेशात असून त्यांनी शिबिराची तारिख ठरली त्या दिवशीच आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचं म्हटलं होतं. तर रोहीत पवार यांनीही ट्विटरवर पोस्ट करत याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सर्वजण सोबत असून शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू, अशी पोस्ट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांना रोहित पवारांसोबत वाद असल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले कि, “माझा कुणाशी काही वाद होऊ शकत नाही. मी पक्षाचं काम करतोय. आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. रोहित पवार परदेशातून लवकर येतील आणि पक्षाच्या कामात सहभागी होतील.”

Jayant Patil |  “2024 हा संघर्षाचा काळ”

शिबिरात जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. शिबिराला आपण मुद्दामहून ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची, असं नाव दिलेलें आहे. या दोन दिवसीय शिबिरामध्ये लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये कधी नव्हे एवढी गरज प्रयत्नांची, कष्टाची आणि निकराच्या लढ्याची आहे याची जाणीव आपल्याला या दोन दिवसांमध्ये होईल, असा मला ठाम विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं.

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे. वित्रीबाईंवर शेण गोळ्यांच्या मारा झाला पण ते आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत. संघर्ष करण्याचा काळ होता त्यांनी संघर्ष केला. आगामी काळात आपल्यासमोर देखील संघर्ष उभा राहिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष असते. 2024 हा निवडणुकीचा काळ होणार आहे, या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!