Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Adani Group | हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानींना (Adani ) मोठा झटका बसला होता. आता मात्र अदानी समूहासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अदानी यांना मोठा दिलासा दिला

सर्वोच्च न्यायालयाचा Adani Group ला दिलासा

सुप्रीम कोर्टाने सेबीला 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत दिली आहे. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास सेबीकडून एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचं कोणतंही कारण नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. जानेवारी 2023 मध्ये, अमेरिकन शॉर्ट सेल फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांवर कथित अनियमिततेचा आरोप केला होता.

मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, सेबीने 22 पैकी 20 प्रकरणांमध्ये तपास पूर्ण केला आहे. ते म्हणाले, ‘सॉलिसिटर जनरलचे आश्वासन लक्षात घेऊन आम्ही सेबीला इतर दोन प्रकरणांचा तपास 3 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देतो.’ सेबीच्या नियामक चौकटीत हस्तक्षेप करण्याचे न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत. SEBI ला FPI आणि LODR नियमांवरील सुधारणा रद्द करण्याचे निर्देश देण्याचे कोणतेही वैध कारण उद्भवलं नाही.

Adani Group च्या शेअर्समध्ये मोठी वाढ

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस 4.35 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्स 2.30 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसले.

याशिवाय अदानी पॉवरमध्ये 4.29 टक्के, अदानी एनर्जीमध्ये 12.04 टक्के, अदानी ग्रीनमध्ये 5.08 टक्के, अदानी टोटलमध्ये 9.10 टक्क्यांची वाढ आणि 5.08 टक्के वाढ दिसून आली. अदानी विल्मारमध्ये टक्के.

महत्त्वाच्या बातम्या- 

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Aishwarya Rai Bachchan | घटस्फोटाच्या चर्चेनंतर अभिषेक पहिल्यांदाच बोलला, म्हणाला…

Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!