…म्हणून Aishwarya Rai ने अभिषेकचं घरं सोडलं?; व्हिडीओमुळे अखेर सत्य समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. या दोघांच्या नात्याबदल अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकबदल दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. या शिवाय ऐश्वर्याने (Aishwarya Rai) सासर सोडल्याची बातमी समोर आलेली. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन वेळेस अभिषेक म्हणाला की, माझे आई-वडिल दुसरीकडे राहतात, म्हणजेच अभिषेक बच्चन आणि पत्नी जया बच्चन दोघेजण ‘जलसा’ बंगल्यात राहतात. तर ऐश्वर्या आणि मी ‘वत्सा’ बंगल्यात राहतो. दरम्यान, ऐश्वर्या अचानक बच्चन कुटुंबाला सोडून दुसरीकडे का राहत आहे या मागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

ऐश्वर्या-अभिषेक वेगळे राहतात?

व्हायरल व्हिडीमधून असं समोर आलं की, ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांनी 2018 मध्येच जलसा बंगला सोडला होता. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. तर काही जणांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.

कमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, “मुंबईत फार कमी विवाहित जोडपे त्यांच्या आई वडिलांसोबत राहतात आणि मला खात्री आहे की इतर कोणतेही बॉलिवूड जोडपे त्यांच्या वडिलांसोबत राहत नाहीत. मग अभिषेक आणि ऐश्वर्याचे अमिताभ आणि जयापासून वेगळे होण्याचं कारण काय आहे?, असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. 

ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये मतभेद-

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात अनेकवेळा मतभेद झाल्याचं स्वतः ऐश्वर्याने सांगितलं. बाॅलिवूडमधील फेमस कपल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचं सांगितलं जातं. मात्र यावर अजूनही बच्चन कुटुंबियांकडून भाष्य करण्यात आलेलं नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.

News Title : hence aishwarya rai left the home this is the reason

थोडक्यात बातम्या-

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?