Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Petrol Diesel Price | लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. अशात पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त होऊ शकतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात कपात करू शकतं, अशा बातम्या येत आहेत. यावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Petrol Diesel Price l पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून वर्तवला जात आहे. डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली राहून 75 ते 77 डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिली. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे.

सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्राशी चर्चा करत नाहीत. सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अशा कोणत्याही मुद्द्यावर सरकारच्या तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

किंमती आधीच खाली आल्या आहेत, त्यामुळे कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी करू शकता, परंतु कर कपातीमुळे अस होणार नाही, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलंय.

Petrol Diesel Price | सध्या काय दर आहेत?

मुंबईत पेट्रोलचे (Mumbai Petrol Price) दर 106.31 रुपये तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहेत. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे, तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून ते कोलकातापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत (Delhi Petrol Price) 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Shreyas Talpade | “मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयस तळपदेनं सांगितली धक्कादायक आपबीती

Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात

Entertainment News | तुमच्या अंगावर काटा आणतील ‘या’ 3 थ्रिलर वेब सिरीज, नक्की पाहा