work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

work out in winter : निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे फार महत्वाचे असते. मात्र सध्या सर्वत्र थंडीचे प्रमाण जास्त असल्याने सकाळच्या वेळी वर्कआउट करणे कठीण जाते. अशावेळी हिवाळ्यात व्यायाम (work out in winter)  करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात रनिंग किंवा वर्कआउट करताना शरीराच्या कुठल्याही भागात वेदना होत असतील तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. जर तुमच्याही बाबतीत असे काही घडत असेल तर वेळीच फिटनेस तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तर याचसंदर्भात आपण वर्कआउट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…

work out in winter l व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्या :

1) हिवाळ्यात वर्कआउट (work out in winter) करताना कोणतेही जड साहित्य उचलू नका. यामुळे तुमच्या शरीरावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
2) जर तुम्हाला रनिंग किंवा जड साहित्य उचलून व्यायाम करायचा असेल तर व्यायाम करण्याच्या 10 मिनिट आधी वॉर्म अप करणे महत्त्वाचे आहे.
3) थंडीच्या काळात व्यायाम करताना उबदार कपडे घालावेत. यामुळे तुमचे शरीर उबदार राहील आणि व्यायाम करताना थंडीपासून बचाव होईल.

4) सर्वात महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने लोक पाणी कमी पितात. मात्र हे शरीरासाठी फार घातक आहे. हिवाळ्यात देखील चार ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच हिवाळ्यात व्यायाम करण्याच्या 1 तास आधी किंवा एक तास नंतर पाणी प्यावे. म्हणजेच स्वतःला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.
5) व्यायाम करताना अचानकपणे शरीराच्या कुठल्याही भागात वेदना होत असतील तर वेळीच सावध व्हा.

work out in winter l वर्कआउट करताना या गोष्टी लक्षात ठेवा :

6) व्यायाम केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती नक्की घ्या. यामुळे शरीरातील स्नायू आपल्या मूळ स्थितःत येण्यासाठी काही मर्यादित वेळ लागतो. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर थोडावेळ विश्रांती घेणं गरजेचं असते.
7) हिवाळ्यात एनर्जी जास्त प्रमाणात लागत असल्याने पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्यावा .

महत्त्वाच्या बातम्या-

Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती