पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

David Warner | ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. पहिले दोन सामने गमावल्यामुळे शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान आहे. यजमान कांगारूंनी 2-0 ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला पाकिस्तानी खेळाडू सैय अयुबने एक अनोखे गिफ्ट दिले, ज्यावरून त्याची खिल्ली उडवली जात आहे.

तिसऱ्या सामन्यातून पाकिस्तानी संघात पदार्पण करत असलेल्या सैय अयुबने एक सोपा झेल सोडला अन् वॉर्नरला जीवनदान मिळाले. पाकिस्तानचे खराब क्षेत्ररक्षण अनेकदा पाहायला मिळाले आहे. किंबहुना त्यांच्या संघाची ओळख देखील खराब क्षेत्ररक्षणाची आहे. सिडनी येथे होत असलेल्या सामन्यात याचा प्रत्यय आला. 37 चेंडूत 20 धावांवर खेळत असताना वॉर्नरला हे जीवनदान मिळाले.

David Warner चा सोपा झेल सुटला

पाकिस्तानकडून चौदावे षटक आमिर जमाल टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर फसला अन् चेंडूने बॅटला स्पर्श करून यष्टीच्या बाजूला उभा असलेल्या अयुबच्या दिशेने कूच केली. मात्र, सोपा झेल घेण्यात अयुबला अपयश आल्याने पाकिस्तानच्या तोंडचा घास गेला. अयुबकडून झेल सुटताच पाकिस्तानी खेळाडूंचा चेहरा पाहण्याजोगा होता. मोहम्मद रिझवानसह बाबर आझम नाराज दिसला.

अलीकडेच वॉर्नरने वन डे क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. अखेरच्या सामन्यातील पहिल्या डावात वॉर्नरला जीवनदान मिळाले पण काही खास कामगिरी करता आली नाही. तो 68 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. अघा सलमानने ऑस्ट्रेलियन सलामीवीराला बाद केले. वॉर्नरचा झेल बाबर आझमने घेतला.

 

David Warner चा अखेरचा सामना

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 77.1 षटकांत सर्वबाद 313 धावा केल्या. मोहम्मद रिझवान (88), अघा सलमान (53) आणि आमिर जमाल (82) यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानला तगडी धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 41.1 षटकांत 105 धावा करून खेळत आहे.

दरम्यान, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातून पाकिस्तानी खेळाडू शाहीन आफ्रिदीला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी काळात पाकिस्तान शाहीनच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. खरं तर मागील 28 वर्षांमध्ये पाकिस्तानला एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकणं पाकिस्तानसाठी गरजेचं आहे.

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट