SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. विद्यार्थ्यांची देखील जोरदार तयारी सुरु आहे. अशातच महाराष्ट्र राज्य शिक्षण (SSC, HSC EXAM) संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

SSC, HSC EXAM |  दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट

यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने प्रलंबित राहिलेल्या मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले आहेत. तरी देखील शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

राज्य सरकारच्या या गलथान कारभारामुळे शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांवर (SSC, HSC EXAM 2024)  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून शिक्षण विभाग महाराष्ट्र सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

SSC, HSC EXAM | दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा काय आहेत?

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC आणि HSC च्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणार आहेत. यंदाच्या वर्षी बारावीची शैक्षणिक लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत पार पडणार आहे.

SSC, HSC EXAM | शिक्षण विभागाच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

1) वर्ष 2012 पासून रिक्त जागा असून देखील शिक्षक भरती झाली नसल्याने शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरात लवकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करून घ्यावी.
2) वर्ष 2004 ते 2013 पर्यंतचे राज्यातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत लवकरात लवकर द्यावे.
3) प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास पूर्णतः विरोध
4) सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती देणे आवश्यक असावे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video

Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य