Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video

Virat Kohli | भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली कायम प्रसिद्धीच्या झोतात असतो. विराटनं केलेली कोणतीही गोष्ट चाहत्यांना भुरळ घालत असते. मैदानावर नेहमी सक्रिय असलेल्या विराटचा सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किंग कोहली शुबमन गिलसोबत डान्स (Virat Kohli and Shubman Gill viral video) करताना दिसतो आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत सध्या कसोटी मालिका खेळत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. बुधवारपासून दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी चाहत्यांचं खूप मनोरंजन झालं.

Virat Kohli चा अनोखा अंदाज

विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी मैदानात फुगडी खेळून सर्वांचं लक्ष वेधलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी चर्चेत आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. पण, मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर यजमानांचा टिकाव लागला नाही. आफ्रिकन संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 55 धावा करू शकला. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी विराट आणि गिल यांनी मैदानात फुगडी खेळल्याचे दिसले. भारतीय खेळाडूंचा अनोखा अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, मोहम्मद सिराजने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकताना 15 धावा देऊन 6 बळी घेतले. यजमानांना आपल्या पहिल्या डावात अवघ्या 55 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात 153 धावा केल्या. खरं तर 153 धावांवर असताना भारताने चार गडी गमावले होते. तिथून पुढे भारताला एकही धाव करता आली नाही आणि सहा फलंदाज एकही धाव न करता तंबूत परतले. सलग सहा फलंदाज शून्यावर बाद होण्याचा विक्रमही या सामन्यातील पहिल्या डावात झाला.

Virat Kohli ची सावध खेळी

दरम्यान, पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने तीन गडी गमावून 62 धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात विराट कोहलीने सर्वाधिक (46) धावा केल्या, तर रोहित शर्मा (39) आणि शुबमन गिलने (36) धावा कुटल्या. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि 102 धावांची आघाडी घेतली होती. खरं तर भारताकडून विराट कोहलीने केलेल्या सावध खेळीमुळं टीम इंडियाला 150 धावांचा आकडा पार करता आला.

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती

‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका