श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी प्रभू श्रीरामांबद्दल (Lord Shri Ram) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता मग तो शाकाहारी कसा असू शकतो? राम आमचा बहुजनांचा आहे, या विधानामुळे राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. या वादावरच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jitendra Awhad यांच्यावर कुणी साधला निशाणा?

प्रभू श्रीराम तसेच कोणत्याही महान युग पुरुषाबद्दल कोणीही चुकीचं वक्तव्य करू नये. अशा युग पुरुषांबद्दल जे कुणी चुकीची वक्तव्ये करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. यासाठी खरं तर कायदा करण्याची गरज आहे. अशा याला विकृती म्हणतात. संत किंवा युगपुरुष कधी मांसाहारी होते का?, असा सवाल करणं ही शोकांतिका असल्याचं उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी म्हटलं आहे.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. देशातील वातावरण राममय झालं असताना आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजपसह ठाकरे गट तसेच राष्ट्रवादीकडून यावर खेद व्यक्त केला जात आहे. तर राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी थेट पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

Jitendra Awhad नेमकं काय म्हणाले?

“राम हा आमचा आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांस खात होता. म्हणून आम्ही पण मांसाहारी आहोत, पण तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात.रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय. रामाने 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असं विधान आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. “आमचा राम बहुजन, क्षत्रिय आणि जातपात न पाळणारा आहे. पण, आता अभ्यासाला  महत्व नसून भावनांना अधिक महत्व दिलं जातं. त्यामुळे माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर खेद व्यक्त करतो.”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या डोक्यात अजूनही वर्णव्यवस्था आहे त्यांना काय बोलणार, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

Udayan Raje Bhosale criticizes Jitendra Awhad

महत्त्वाच्या बातम्या- 

Big Boss 17 | ‘जळक्या…माझ्यावर नेहमी जळतो’; अंकिता-विकीचं पुन्हा जोरदार भांडण

SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

Eknath Shinde | सर्वात मोठी बातमी!; शिंदे सरकारने घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

Deepika Padukone ने दिली गुड न्यूज, म्हणाली ‘रणवीर सिंग आणि मी…’

‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा