Big Boss 17 | ‘जळक्या…माझ्यावर नेहमी जळतो’; अंकिता-विकीचं पुन्हा जोरदार भांडण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) बिग बॉसच्या 17 (Big Boss 17 )व्या सीझनमध्ये सामील झाली आहे. बिग बॉसमध्ये सामील होताच अगदी सुरुवातीपासून या जोडप्यांमधील भांडण दिसून आलं. त्यांच्यातील मतभेद बऱ्याचदा घरापर्यंत पोहोचले. आता असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात अंकिता आणि विकीचं पुन्हा बिनसल्याचं दिसून येत आहे. अंकिताला बिग बॉस हाउसची कॅप्टन बनवण्यात आलंय. मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय आणि ऑरा नंतर अंकिता लोखंडे चौथी कॅप्टन बनली आहे. याच कारणामुळे विक्की आणि अंकितामध्ये बिनसल्याचं व्हिडीओतून कळतंय.

Big Boss 17| अंकिता-विकीत शाब्दिक चकमक

बिग बॉसची कॅप्टन बनल्यानंतर अंकिताने बिग बॉसच्या घरातील काम घरातील सदस्यांमध्ये वाटून दिले. यात तिने पती विकी जैनला साफसफाईची जबाबदारी दिली.याबाबत जेव्हा ती विकीशी बोलायला गेली तेव्हा विकीने (Vicky Jain) काम करण्यास नकार दिला. यावर तीने ‘तुम्ही कॅप्टनचा आदर करायला हवा’, असं म्हटलं. तर विकीने प्रत्युत्तर देत कॅप्टनचा मान वर्तनावर असेल, असं म्हटलं.

अंकिता आणि विकी यांच्यात कामावरून सुरू झालेल्या वादाचं रुपांतर नंतर भांडणात झालं. ‘तू करतेस तरी काय?, तुला काय येत’ असं चिडून विकी अंकिताला म्हणाला. यावर अंकिताने रागात उत्तर दिलं.’तुला तरी काय येत, नेहमी जळत असतो माझ्यावर… गाढव.. जळकुकडा’, असं म्हणत अंकिताने आपला राग व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Khabri (@realthekhabri)

Bigg Boss 17 | अंकिता-विकी वादामुळे सतत चर्चेत

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये तीन स्पर्धक बाहेर गेले आहेत. सलमान खानने रिंकू धवन, नील भट्ट आणि अनुराग डोवाल यांना बाहेर काढलं आहे. आता बिग बॉसच्या घरातून अजून काय काय पाहायला मिळतं याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. अंकिता लोखंडे ही यंदाच्या सिझनची पक्की दावेदार समजली जात आहे. मात्र ती पती विकीसोबतच्या भांडणामुळेच अधिक चर्चेत असते.

महत्वाच्या बातम्या

Bigg Boss 17 Argument between Ankita Lokhande and Vicky Jain