Maharashtra Cabinet | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Cabinet | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2005पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet | शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत (Maharashtra Cabinet) जुन्या पेन्शनसंदर्भात चर्चा झाली आणि मोठा निर्णय घेण्यात आला. 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीत घेण्यात आला. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साडे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला मोर्चा धडकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली होती. यावेळी आंदोलकांना प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. या आंदोलकांनी दोन महिन्याची मुदत दिली होती. या मुदतीच्या आत सरकारने हा निर्णय घेतला.

Maharashtra Cabinet | सरकारचे 10 निर्णय-

  1. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा.
  2. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये.
  3. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान.
  4. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार.
  5. मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
  6. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. 400 उद्योगांना फायदा.
  7. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र 2” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ.
  8. द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबवणार.
  9. नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. 750 कोटीस मान्यता.
  10. सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Big Boss 17 | ‘जळक्या…माझ्यावर नेहमी जळतो’; अंकिता-विकीचं पुन्हा जोरदार भांडण

SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

Eknath Shinde | सर्वात मोठी बातमी!; शिंदे सरकारने घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

Deepika Padukone ने दिली गुड न्यूज, म्हणाली ‘रणवीर सिंग आणि मी…’

‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा