Deepika Padukone ने दिली गुड न्यूज, म्हणाली ‘रणवीर सिंग आणि मी…’

Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघे चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका दोघा जणांनी ‘कॅाफी विथ करण’ शोमध्ये एन्ट्री केली होती. या वेळी दीपिकाला तिच्या उत्तरामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान दीपिकानी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

काय म्हणाली दीपिका?

दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीर या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष झाले असून त्यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना दीपिका म्हणाली की, मी आणि रणवीर लवकरच आपल्या स्वत:च्या कुटुंबाची सुरुवात करणार आहेत.

दीपिका पुढे काय म्हणाली?

दीपिकाला फॅमिली प्लॅनिंगबदल विचारण्यात आलं यावेळी दीपिका म्हणाली की, “रणवीरला आणि मलाही लहान मुलं प्रचंड आवडतात. पुढे ती म्हणाली की, आम्ही आमच्या स्वत:च्या कुटुंबाची सुरुवात कधीपासून करणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.”

यावेळी दीपिकावे प्रसिद्धीविषयी देखील भाष्य केलं. ज्या लोकांसमोर मी माझ्या आयुष्यात लहानाची मोठी झाले ते कायम मला सांगत असतात की, तू अजिबातबदलेली नाहीयेस. इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर बदलणं खूप सोपं असतं, असं दीपिका म्हणाली.

“इंडस्ट्रित आल्यावर डोक्यात वेगळी हवा जाते”

जेव्हा कोणी इंडस्ट्रित पाय ठेवतं त्यावेळेस त्यांच्या डोक्यात वेगळी हवा जाते. मात्र, माझ्यासोबत असं कधी झालं नाही. असं मला माझे घरचे सांगतात. माझे घरचे मला कधी एखादी मोठी सेलेब्रिटी म्हणून वागणूक देत नाहीत. मी माझ्या घरी असताना एक सामान्य मुलगी आणि सामान्य बहीण असते. ही गोष्ट कधीच बदलू नये असं मला वाटतं. माझ्या कुटुंबीयांमुळे माझे पाय जमिनीवर राहतात. हेच मूल्य मला आणि रणवीरला आमच्या मुलांमध्ये रुजवायचे आहेत”, असं दीपिका म्हणाली.

News Title : Deepika padukone gives good news for her fans

महत्त्वाच्या बातम्या-

‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा

Sourav Ganguly चा टीम इंडियाला मोलाचा सल्ला!

Aishwarya Rai ने ‘या’ व्यक्तीची भेट घेतली?, व्हिडीओमुळे एकच खळबळ

Mukesh Ambani l Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने आणला जबरदस्त प्लॅन

‘पैसे गोळा करून याला कपडे घेऊन द्या’; Amir khan चा जावई ट्रोल