Sourav Ganguly चा टीम इंडियाला मोलाचा सल्ला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sourav Ganguly | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या नजरा आहेत. केपटाउन इथं होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेत यजमानांना घाम फोडला. याचाच दाखला देत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच भारतीय संघाने चांगली फलंदाजी केल्यास नक्कीच हा सामना आपण जिंकू असा विश्वास गांगुलीनं व्यक्त केला.

Sourav Ganguly नेमकं काय म्हणाला?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्षुदेव साय यांच्या भेटीनंतर गांगुलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने 2023 च्या वन डे विश्वचषकातील पराभवावर देखील भाष्य केलं. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानंतर तमाम चाहत्यांप्रमाणे मलाही दु:ख झालं. मात्र, आगामी काळात भारतीय संघ हा किताब नक्कीच जिंकेल, असं त्यानं नमूद केलं. भारतानं 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अद्याप एकदाही आयसीसीचा किताब जिंकला नाही.

Sourav Ganguly चा टीम इंडियाला मोलाचा सल्ला

गांगुलीने पत्रकारांशी बोलताना म्हटले, “आपण एवढं चांगलं क्रिकेट खेळूनही विश्वचषक जिंकता आला नाही याचं दु:ख आहे, पण भविष्यात हे स्वप्न साकार होऊ शकतं. संघात चांगल्या खेळाडूंची फळी आहे. भारताने केपटाउनमध्ये अवघ्या 55 धावांत यजमानांना गुंडाळलं. त्यामुळं मला वाटतं की, भारताने चांगली फलंदाजी केली तर नक्कीच आपण हा सामना जिंकू. आपण या आधी तिथे वन डे मालिका जिंकली आहे.”

केपटाउन कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमानांना 55 धावांत सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघाने 153 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ६२ धावा आहेत. भारत अद्याप 36 धावांनी पुढे आहे.

Sourav Ganguly कडून टीम इंडियाचं कौतुक

दरम्यान, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. मागील 32 वर्षात टीम इंडियाला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आली नाही. यंदा देखील तेच झालं पण मालिका बरोबरीत ठेवण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघावर आहे. भारताच्या अप्रतिम गोलंदाजीची भुरळ गांगुलीलाही पडली अन् त्याने टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले.

मोहम्मद सिराजने केवळ 15 धावा देत 6 सहा बळी घेतले. त्यामुळे यजमानांना केवळ 55 धावा करता आल्या. भारताकडून पहिल्या डावात विराट कोहलीने सर्वाधिक (46) धावा केल्या, तर रोहित शर्मा (39) आणि शुबमन गिलने (36) धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या 7 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.

Two-Wheeler Launches In January 2024 : दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन

Women Employee Pension | पेन्शनच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पेन्शनधारकांनी आत्ताच वाचा!

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार?, पेट्रोलियम मंत्रालयानं दिली सर्वात मोठी माहिती