‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sonam Kapoor | फॅशनच्या बाबतीत नेहमी सक्रीय असणारी अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना भुरळ घालत असते. मात्र मुलगा’वायू’च्या जन्मानंतर सोनमला पुन्हा पहिल्यासारखा फिटनेस मिळवण्यासाठी तब्बल 16 महिने लागल्याचं तीने सांगतलंय. पोस्ट प्रेग्नेन्सीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात.

पहिल्यासारखा फिटनेस मिळवण्यासाठी बरेच दिवस लागतात. त्यात योग्य डाएट आणि एक्सरसाइजवरही लक्ष द्यावं लागतं. मात्र सोनमने असं काहीही न करता पुन्हा स्वतःला फिट कसं केलं याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तीने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पोस्ट प्रेग्नेन्सीनंतरचं आयुष्य कसं होतं याबाबत खुलासा केला आहे.

Sonam Kapoor ने शेअर केला पोस्ट प्रेग्नेन्सीनंतरचा अनुभव

“मला पुन्हा स्वतःसारखं वाटायला तब्बल 16 महिने लागले. कोणत्याही क्रॅश डाएटशिवाय आणि वर्कआउट्सशिवाय मी फक्त स्वतःची आणि माझ्या बाळाची काळजी घेत राहिले. मी अजूनही तिथपर्यंत पोहोचली नाहीये. यासाठी मी अजूनही परिश्रम घेत आहे. मात्र, मी माझ्या शरीराबद्दल कायम कृतज्ञ आहे. हे खूप अविश्वसनीय आहे. खरंच एक स्त्री असणं ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे”, असं सोनम कपूर म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

Sonam Kapoor च्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया-

सोनम कपूरने सुंदर पांढऱ्या घागऱ्यावरील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पांढर्‍या आणि सोनेरी बॉर्डरच्या कॉम्बिनेशनच्या पोशाखात ती खूपच सुंदर दिसत आहे. तीच्या या पोस्टवर चाहत्यांच्याकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘स्त्री असणं हे जीवनाचं मूळ अस्तित्व आहे.’,’एक महिला असणं खरच आश्चर्यकारक आहे.’, अशा कमेंट्स चाहत्यांनी सोनमच्या पोस्टवर केल्या आहेत.

‘ज्याने तुम्हाला नेहमी पाहिलं आहे आणि तुम्हाला एका चाहत्याप्रमाणे फॉलो केलं आहे, अशा विषयांवरील तुमच्या बोलण्याचा माझ्यासारख्या लोकांवर खोलवर परिणाम होतो. आपण माणसं आहोत या वस्तुस्थितीबद्दल बोलण्याचं महत्त्व काय आहे. अशा जगात जिथे सोशल मीडिया कोणालाही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यासाठी सहजपणे मूर्ख बनवू शकतो, अशा जगात तु नेहमी सगळ काही वास्तविक ठेवलं आहे,’असं म्हणत एका चाहत्याने सोनमचं कौतुकही केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Sonam Kapoor comments for the first time on post pregnancy life