Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

संभाजीनगर | नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही राडा होत असतो. गौतमीचा ज्या भागात कर्यक्रम असतो त्यावेळी गौतमीला पाहण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करता. त्यांना सांभाळताना पोलिसांची चांगलीच कसरत होते.  गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समिकरणच झालंय. आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलला (Gautami Patil) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आलीये. संभाजीनगरमध्ये झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात तरूणांनी प्रचंड गौंधळ घातला.

Gautami Patil च्या कार्यक्रमात तुफान राडा

राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अब्दुल सत्तार हे कार्यकर्त्यांवर नाराज झाले. ते कार्यकर्त्यांना खाली बसा, खाली बसा असे वारंवार आवाहन केले. त्यानंतर गोंधळ सुरु राहिल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

हुल्लडबाजांना अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ

कार्यक्रम सुरु होताच बसण्याच्या मुद्द्यावरुन प्रेक्षकांमध्ये वादावादी सुरु झाली, त्याचे रुपांतर हुल्लडबाजीत झाले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी स्टेजवर येत हुल्लडबाजांना चांगलाच दम भरला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी वापरलेली खालच्या दर्जाची भाषा हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सत्तारांचा व्हिडीओ व्हायरल 

व्हिडीओ पाहून नेटकरी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करीत आहेत. महायुती सरकारमधील इतक्या मोठ्या मंत्र्याला भर स्टेजवरून शिवीगाळ करण्याची भाषा शोभते का? असा सवाल सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM : या कारणामुळे दहावी, बारावी बोर्ड परीक्षांमध्ये अडथळा येण्याची शक्यता

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video