IPL 2024 : यंदाच्या आयपीएल विश्वातून 3 क्रिकेटर निवृत्त होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 l  वर्ल्डकप नंतर सर्व क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) चे वेध लागले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी आयपीएलचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान गुजरात टायटन्स या संघाकडे सर्वात जास्त पर्स असल्याने त्यांनी अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाचे आयपीएल सामने खेळणार की नाही यावरून चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र महेंद्रसिंह धोनी यंदाच्या वर्षी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल लीग खेळू शकतो. महेंद्रसिंह धोनी सोबतच अजून 5 क्रिकेटर असे आहेत की त्यांचे आपण इंडियन प्रीमियर लीगमध्ये शेवटचे सामने पाहू शकतो.

IPL 2024 l  क्रिकेटर दिनेश कार्तिक : 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएल लीगमध्ये शेवटचा परफॉर्मन्स करण्याची शक्यता आहे. दिनेश कार्तिक 2018 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा कर्णधार होता.

मात्र आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 5.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघाचा एक महत्वपूर्ण भाग बनवले आहे. तसेच दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वोत्तम T20 फलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल मधून निवृत्ती घेतल्यानंतर दिनेश कार्तिक कॉमेंट्री करण्यावर पूर्ण वेळ केंद्रित करण्याची शक्यता आहे.

IPL 2024 l  क्रिकेटर अमित मिश्रा : 

लेग-स्पिनर म्हणून ओळखला जाणारा आयपीएलचा दिग्गज क्रिकेटर अमित मिश्रा यंदाच्या वर्षी आयपीएल मधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये अमित मिश्राच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत.

अमित मिश्रा आयपीएल 2015, आयपीएल 2016 आणि आयपीएल 2017 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला आहे. जानेवारी 2018 मध्ये, त्याला 2018 आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने विकत घेतले होते.

IPL 2024 l  MS Dhoni : 

टीम इंडियाचा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी यंदाच्या वर्षी शेवटचा  आयपीएल सामना खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात धोनीने सीएसकेचे पाचवे विजेतेपद जिंकले आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट विश्वात मोठे स्थान निर्माण केले आहे. मात्र यंदाच्या वर्षी तो शेवटचे आयपीएल लीग खेळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक