Mukesh Ambani l Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने आणला जबरदस्त प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mukesh Ambaniभारतातील श्रीमंतांच्या यादीत टॉपवर असणारे भारतीय उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मागील काही वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अंबानींच्या या श्रीमंतीत त्यांचा मुख्य व्यवसाय रिलायन्स डिजिटल आणि जिओचा सर्वात मोठा हात असून रिलायन्स जिओने मागील काही काळापासून दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती आणली. जिओबाबत बोलायचे झाले तर जिओने भारतात सर्वात आधी 4जी आणि नंतर 5 जीची सेवा सुरु केली. त्यामुळे जिओची दूरसंचार सेवेत वेगवान क्रांती घडवली. त्यानंतर आता रिलायन्स जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन तयार केला आहे. याबाबत सविस्तर घोषणा खुद्द या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे.

Mukesh Ambani l  नेमके काय म्हणाले मुकेश अंबानी 

अंबानीनेने घोषणाप्रमाणे..; लवकरच रिलायन्स जिओ आता थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात सेवा देणार आहे. ज्यामुळे देशातील हजारो ग्राहकाला आता झटपट संवाद साधता येईल. तसेच रिलायन्स जिओला आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिससेचे अधिकार मिळू शकतात असेही ते यावेळी म्हणाले.

एवढेच नव्हे तर कॅपनी सॅटेलाईट आधारे गिगाबिट फायबर सेवा सुरु करु शकते. त्यासाठी लागणारी परवानगी ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर (IN-SPACe) कडून याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

Mukesh Ambani l  जिओची स्पर्धा कोणाशी?

अंबानींच्या रिलायन्स जिओला बाजारात सध्या सुनील भारती मित्तल यांची एअरटेल आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे एलॉन मस्क यांच्या Starlink पण मैदानात उतरली आहे. त्यामुळे रिलायन्सला सॅटेलाईट या क्षेत्रात एअरटेल सोबत स्टेरलिंक यांचे जोरदार आव्हान असणार आहे.  एअरटेलने यापूर्वी त्यांच्या OneWeb सेवेचा प्रारंभ केला असून इतकेच नाही तर एमेझॉन आणि टाटा पण संयुक्तपणे या क्षेत्रात उडी पुढील काही काळात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सॅटेलाईटची थेट संवाद सेवा सुरु करण्यासाठी इन-स्पेसकडून परवानगी मिळणे सोपे काम नसून त्यासाठी केवळ एका विभागाची नाही तर अनेक विभागांची, मंत्रालयांची परवानगी मिळवावी लागते असे यावेळी त्यांनी सांगतले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Virat Kohli ची विकेट पडताच Anushka ने केलं असं काही की….

IPL 2024 : यंदाच्या आयपीएल विश्वातून 3 क्रिकेटर निवृत्त होण्याची शक्यता

Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!