Eknath Shinde | सर्वात मोठी बातमी!; शिंदे सरकारने घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या(Maharashtra Cabinet) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातीलच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी नेमका किती टोल. याबाबत मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde | शिंदे सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना 250 रुपये टोल भरावा लागणार आहे. केंद्र सरकाच्या निकषांनुसार या सेतूवरील प्रवासाठी 500 रुपयांचा टोल लागणार होता. मात्र शिंदे सरकारने तो 250 रुपये केल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल असून यामुळे मुंबई आणि नवी मुंबई यामाधील अंतर केवळ 30 मिनिटांवर आले आहे. हा सागरी सेतू मुंबई आणि नवी मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या महत्त्वाच्या मार्गांशीही जोडला जाणार आहे. यामुळे इंधनाची इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. 21.08 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थितीत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Eknath Shinde | सरकारचे 10 निर्णय-

  1. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा.
  2. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये.
  3. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान.
  4. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार.
  5. मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
  6. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. 400 उद्योगांना फायदा.
  7. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र 2” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ.
  8. द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबवणार.
  9. नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. 750 कोटीस मान्यता.
  10. सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.

महत्त्वाच्या बातम्या-

Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक