Sourav Ganguly च्या 22 वर्षाच्या ‘लेकी’ला लाखोंचं पॅकेज; आकडा वाचून बसेल धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sourav Ganguly | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या ‘दादा’गिरीसाठी प्रसिद्ध असलेला गांगुली सध्या क्रिकेट विश्वापासून दूर आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसतो. अलीकडेच तो दुबईत आयपीएलच्या मिनी लिलावावेळी दिसला होता. गांगुलीप्रमाणे त्याची मुलगी देखील यशाच्या शिखराकडे कूच करत आहे. त्याची मुलगी सना गांगुली तिच्या करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या चढत आहे.

Sourav Ganguly च्या मुलीची गरूडझेप

क्रिकेटपटूंची मुलं क्रिकेटकडेच वळतील असं गृहीत धरलं जातं. पण, गांगुलीच्या मुलीनं अभ्यासाकडे लक्ष वळवलं अन् गरूडझेप घेतली. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून सनानं (UCL) पदवी घेतली. खरं तर पदवी घेण्यापूर्वीच तिनं कामाला सुरुवात केली आणि ती जगातील एका मोठ्या कंपनीत काम करत आहे.

सौरव गांगुलीच्या मुलीचा जन्म 2001 मध्ये झाला आणि आता ती 22 वर्षांची आहे. सनानं तिचं शालेय शिक्षण लोरेटो हाऊस स्कूल, कोलकाता इथून पूर्ण केलं आणि नंतर अर्थशास्त्र विषयात बॅचलर पदवी घेण्यासाठी यूसीएल युनायटेड किंगडममध्ये प्रवेश घेतला. तिच्या महाविद्यालयीन कार्यकाळात सना गांगुलीनं अनेक इंटर्नशिप पूर्ण केल्या.

Sourav Ganguly च्या मुलीला लाखोंचे पॅकेज

सना गांगुली लाखोंच्या पॅकेजवर MNC कंपनीत काम करते. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून पदवी घेतलेल्या सनानं मागील वर्षी तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मात्र याआधीच तिनं कामाला सुरुवात केली होती. सना गांगुली 2020 पासून या संस्थेत शिकत आहे.

दरम्यान, UCL मधून पदवी घेत असताना सनानं कॅम्पसमध्ये Enactus इथं काम केलं आणि HSBC, KPMG, Goldman Sachs, Barclays आणि ICICI सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी देखील काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली.

Sourav Ganguly च्या मुलीला 30 लाखांचं पॅकेज

तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या काही काळापूर्वी, सना गांगुलीनं जगातील सर्वात मोठ्या कंपनींपैकी एकामध्ये इंटर्नशिप सुरू केली. इंटर्नशिपद्वारे व्यावसायिकांना ऑफर केलेल्या इंटर्नशिप पॅकेजची किंमत प्रति वर्ष 30 लाखांपर्यंत असते. एकूणच गांगुलीची लेक वर्षाला तीस लाखांचं पॅकेज घेते.

work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक

Virat Kohli आणि शुबमन गिलची भर मैदानात ‘फुगडी’, पाहा Video

Two-Wheeler Launches In January 2024 | दमदार आणि आकर्षक फीचर्ससह या महिन्यात लाँच होणार या 4 बाईक्स

Jitendra Awhad | ‘एवढी वर्ष जंगलात राहून…’; श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Virat Kohli | ‘राम सिया राम’…; भरमैदानात किंग कोहली रामलल्लांच्या भक्तीत तल्लीन