Sharad Pawar | शरद पवारांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली, मोदींचं नाव घेत म्हणाले…

शिर्डी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. शिर्डीत दोन दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीर होत आहे. आज या शिबीराचा समारोप झाला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगता होत असलेल्या शिबीरातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना पवारांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.

Sharad Pawar यांनी नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली

केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत. सर्व योजना हवेत आहेत. या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत, असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितलं जात आहे. पण मोदी गॅरंटी काही खरी नाही, असा घणाघात शरद पवारांनी मोदी सरकारवर केला.

मोदी संसदेत क्वचितच येतात. मोदी एक दिवशी म्हणालेले 2022 पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घरं देऊ. पण ही घोषणा हवेतच राहिली. माझी गॅरंटी आहे, असं मोदी वारंवार सांगतात. पण ती गॅरंटी काही खरी नाही. याचा अनुभव हा अनेकवेळेला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar | “मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक अपमानित”

मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक अपमानित झाल्या. शरमेने मान खाली घालावी लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं आहे. आदिवासी महिलांवरही देशात अत्याचार होत आहेत. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहे. त्याचा आनंद आहे. एका लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. पण त्या पदाचा ते किती सन्मान करतात, असं सांगत पवारांनी सरकारवर टीका केलीये.

जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू तयार केली. पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं, तेव्हा राष्ट्रपतीचं अभिभाषण सुरू होतं. हा आपला पायंडा आहे. पण नवीन पार्लमेंट बांधलं. त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही. त्यांचा सन्मान केला नाही. अशा किती तरी गोष्टी सांगता येतील, असं पवार म्हणालेत.

देशातील लहान घटकांना मदत न करण्याची भाजपची भूमिका आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांना मानतो. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या मनात शाहू, फुले, आंबेडकर नाहीत. तर गाय, गोमूत्र ही त्यांची भूमिका आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sourav Ganguly च्या 22 वर्षाच्या ‘लेकी’ला लाखोंचं पॅकेज; आकडा वाचून बसेल धक्का

Maharashtra Cabinet | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Big Boss 17 | ‘जळक्या…माझ्यावर नेहमी जळतो’; अंकिता-विकीचं पुन्हा जोरदार भांडण

SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

Eknath Shinde | सर्वात मोठी बातमी!; शिंदे सरकारने घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय