Urfi Javed च्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, रुग्णालयातील फोटो व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | उर्फी जावेद कायम आपल्या वेगवेगळ्या लूक्समुळे चर्चेत असते. कॅमेऱ्यासमोर उर्फी कधी काय घालून येईल काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर उर्फीची फॅन फॅालोइंग देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उर्फीला तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम ट्रोल केलं जातं. आपल्या फॅन्ससाठी उर्फी सतत नवीन फोटोज शेअर करत असते आणि त्याचवेळी ती वादाच्या भोवऱ्यात सापडते. दरम्यान, उर्फीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

काय आहे प्रकार?

उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर चांगलिच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी उर्फीचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन करण्यात आलं होतं. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर उर्फीचा नवा फोटो व्हायरल होत आहे. उर्फीचा एका रुग्णालयातला फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला फोटो स्वतः उर्फीने शेअर केला. मात्र, काही वेळातच उर्फीने तो फोटो डीलिट केला. मात्र, त्याधीच तिच्या चाहत्यांनी तिचा फोटो हँडलवरुन काढत सर्वत्र व्हायरल केला.

Urfi

नेमकं काय घडलं?

उर्फीने रुग्णालयातील शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला. या फोटोमध्ये उर्फी रुग्णालयातील एका बेडवर झोपली आहे. शिवाय तिच्या चेहेऱ्यावर ऑक्सिजन लावलेलं दिसत आहे. शिवाय तिने नेब्युलायझरही लावलं आहे. आजारी असताना उर्फी रुग्णालयाच्या बेडवर झोपून पोझ देताना दिसत आहे. या फोटोसोबत उर्फीने (Urfi Javed) कॅप्शन देखील दिलं आहे.

कॅप्शनमध्ये काय म्हटलं?

उर्फीने या पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिलंय. “2024 ची धमाकेदार सुरुवात.” तिने केलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची काळजी लागून राहिली आहे. अनेकांनी कमेंट करत ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. आता उर्फीच्या उर्फीला अनेकदा तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे कौतुक कमी तर लोकांच्या टिकेचा जास्त सामना करत असते. आता तिच्या तब्येतीबद्दल अनेकजण तर्क-वितर्क लावत आहेत.

News Title : urfi javed hospitalized photo goes viral

महत्त्वाच्या बातम्या –

Sourav Ganguly च्या 22 वर्षाच्या ‘लेकी’ला लाखोंचं पॅकेज; आकडा वाचून बसेल धक्का

Maharashtra Cabinet | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Big Boss 17 | ‘जळक्या…माझ्यावर नेहमी जळतो’; अंकिता-विकीचं पुन्हा जोरदार भांडण

SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

Eknath Shinde | सर्वात मोठी बातमी!; शिंदे सरकारने घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय