Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sridevi । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहणारी जान्हवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवी तिची बहीण खुशी कपूरसोबत कॉफी विथ करण शोमध्ये गेली असता तिने काही मोठे खुलासे केले आहेत. जान्हवी आणि खुशी दोघींनीही या शोमध्ये अनेक खुलासे केले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल बोलताना अभिनेत्रीच्या मुली भावूक झाल्याचे दिसले.

Sridevi चा अपघाती मृत्यू

जान्हवी कपूरची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू हा अपघाती होता. दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. त्यावेळी जान्हवीचे वडील अन् श्रीदेवीचे पती बोनी कपूरही दुबईत होते. आईच्या मृत्यूची बातमी पहिल्यांदा कानावर पडताच जान्हवीची प्रकृती बिघडली होती. बोनी कपूर यांनी जान्हवीला श्रीदेवीच्या मृत्यूची माहिती दिली होती.

जान्हवीने करणशी बोलताना म्हटले, “जेव्हा मला फोन आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते आणि मला खुशी तिच्या खोलीतून रडताना ऐकू आली. मी पटकन तिच्या खोलीत रडत रडत पळत गेले. पण मला आठवते की खुशीने माझ्याकडे पाहिल्यावर ती रडायची थांबली. ती फक्त माझ्या शेजारी बसली आणि माझे सांत्वन करू लागली आणि तेव्हापासून मी तिला कधीही रडताना पाहिले नाही.”

Sridevi चा 2018 मध्ये मृत्यू

खुशीने सांगितले की, ही बातमी मला कळताच मी समजून गेले की आता मला सर्वांसोबत उभे राहावे लागणार आहे. अर्थात सर्वांची काळजी घ्यावी लागेल. म्हणून मी माझ्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहिले. 2018 मध्ये आईच्या निधनाने देशाला मोठा धक्का बसला होता. तेव्हा कल्पना करा की आमची काय अवस्था झाली असेल. आम्ही स्वतःला कसे आवरले असेल?

दरम्यान, कामाच्या बाबतीत खुशी आणि श्रीदेवीमध्ये साम्य असल्याचेही जान्हवीने उघड केले. आईप्रमाणे खुशी खूप शांत आहे आणि मला वाटते की तिच्यात आणि मम्मामध्ये हेच साम्य आहे. पण ती कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडायला लागते.

दरम्यान, जान्हवी कपूर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. ती ग्लॅमरस, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधते. जान्हवीच्या तुलनेने खुशी प्रसिद्धीपासून काहीशी दूर असल्याचे दिसते.

Wheat Disease l शेतकऱ्यांनो…गहू पिकावर या रोगांचा होऊ शकतो प्रादुर्भाव; वेळीच सावध राहा

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजना; जाणून घ्या या योजनेचा कोणाला व कसा मिळतो लाभ

Tourist Places : फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या मनमोहक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.

Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?