Yashwantrao Chavan Gharkul Yojana l घराचं स्वप्न पूर्ण होणार; घरकुल योजनेचा ‘या’ लोकांना मिळणार लाभ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l आपल्याला माहिती आहे कि अनेकदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक अनेक सरकारी योजनांसाठी पात्र असून देखील, त्याचा लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे अशा जमातीच्या सर्वसामान्य लोकांना या योजनेसंबंधित सविस्तर माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेसाठी सांगणार आहोत. जी योजना राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजना नावाने ओळखले जाते. हि योजना प्रामुख्याने समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात असून या योजनेचा लाभ मुख्यतः भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कुटुंबांना घेता येतो. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच गुंठे जमीन दिले जाते तर एवढेच नव्हे तर 269 चौरस फूटाचे घर देखील बांधून दिले जाते.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l काय आहे या योजनेचे उद्दिष्ट?

– भटक्या जमातीचा विकास करणे.
– राज्यातील भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे
– भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे.
– भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे.
– त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l या योजनेसाठी कोण लाभार्थी होऊ शकतो?

– गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक
– विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी अटी काय?

– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न साधारण एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
– अर्जदार हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
– अर्जदाराकडे स्वतःचे घर नसावे.
– अर्जदार कच्च्या घरात अथवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
– या योजनेचा लाभ प्रत्येक कुटूंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळेल.
– तसेच लाभार्थी हा कुटूंब भूमिहीन असावे.
– लाभार्थी साधारण सहा महिन्यांहून अधिक काळ एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
– हि योजना फक्त ग्रामीण भागासाठी लागू असेल.
– या व्यतिरिक्त कोणत्या अर्जदाराला वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल, तर त्याने रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत अर्ज करावा

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l या योजनेचे प्राधान्य कोणाला?

प्रामुख्याने गावोगावी भटकंती करुन उपजीविका करणारे लोक, अपंग, महिला, पूरग्रस्त क्षेत्र, दारिद्र्य रेषेखालील कुटूंब, विधवा, परितक्ता यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l अर्ज कुठे करावा? :

आपआपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही अर्ज करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

Tourist Places : फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या मनमोहक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.

Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा