Wheat Disease l शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; वेळीच व्हा सावध नाहीतर होईल मोठं नुकसान

Wheat Disease l गहू हे जगातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. प्रामुख्याने गव्हाचा उपयोग हा चपाती, बेकरी प्रॉडक्ट्स आणि अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी केला जातो. गहू या पिकाची लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते. मात्र गहू पिकावर विविध प्रकारचे रोग पडतात. मात्र गहू पिकवणार पडणाऱ्या रोगामुळे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला ही मोठी समस्या भेडसावत असते. मात्र सुरुवातीच्या काळात गहू पिकावर कोणते रोग पडतात व त्याची लक्षणे व उपाय योजना काय आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात…

Wheat Disease l तपकिरी गंज रोग :

गहू पिकाच्या पानांवर तपकिरी रस्ट पडतात हा एक गहू पिकावरील आजार आहे. पिकाचे तपकिरी रस्टपासून संरक्षण करण्यासाठी 5 लिटर ताक 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तसेच हिबिस्कसच्या कोरड्या पानांच्या अर्कची फॉलियार फवारणी देखील गंज संसर्ग रोखू शकते. तसेच गहू पिकावर तपकिरी गंज रोग पडल्यास उत्पनामध्ये देखील घट होते.

Wheat Disease l पिवळा गंज रोग :

गहू पिकावर पिवळ्या गंज रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर प्रोपिकोनाझोल (टिल्ट) 25 ईसी @ 0.1 % (1 मिली/लिटर) फवारणी करावी. गव्हाचे पीक प्रभावीपणे झाकण्यासाठी हेक्टरी 0.5 लिटर बुरशीनाशक पुरेसे असू शकते. तसेच पिवळा गंज रोग Puccinia striformis नावाच्या बुरशीमुळे होतो असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळे पट्टे दिऊन येतात. मात्र हा रोग जसजसा वाढतो तसतशी संपूर्ण पाने पिवळी पडतात.

Wheat Disease l मिल्ड्यू रोग :

मिल्ड्यू रोग हा गहू पिकाच्या पानांवर व खोडावर पांढरे फुगवटे तयार करतो. पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास काही काळानंतर पांढरे पुस्टुलेट तपकिरी आणि शेवटी काळे रंगाचे फुगवटे तयार होतात. क्लोरोथालोनिल हे गव्हावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक संरक्षक बुरशीनाशक आहे. तांबे, बुरशीनाशके आणि गंधक यांचाही वापर या रोगावरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजना; जाणून घ्या या योजनेचा कोणाला व कसा मिळतो लाभ

Tourist Places : फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या मनमोहक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.

Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!