Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virender Sehwag | भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकून इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. केवळ पाच सत्रात सामन्याचा निकाल लागला आणि पाहुण्या भारताने बाजी मारली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाउन येथे खेळला गेला, ज्यात भारतीय संघाने 7 गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला.

5 दिवस चालणारा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. त्यामुळे हा सामना सर्वाधिक चर्चेचा विषय बनला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. कारण दोन्हीही संघांना फलंदाजी गोलंदाजीची पुरेशी संधी मिळाली होती. खरं तर अवघ्या दीड दिवसात सामना संपल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे.

Virender Sehwag चा निशाणा कोणावर?

काहींनी खराब खेळपट्टीचा दाखला देत केपटाउनच्या खेळपट्टीला कमी रेटिंग दिले. मात्र, भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागच्या एका पोस्टने एकच हशा पिकला. वीरूने मिश्किल टिप्पणी करत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा सेहवाग सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.

Virender Sehwag ची मिश्किल टिप्पणी

आता त्याने भारतीय संघाचा बचाव करताना पोस्टच्या माध्यमातून म्हटले, “आप करो तो चमत्कार… हम करें तो पिच बेकार… 107 षटकांत कसोटी सामना संपला. वेगवान गोलंदाजांचे काहीही झाले तरी आपण आपल्या गुणवत्तेपेक्षा जास्त धोकादायक आहोत हेही यावरून सिद्ध होते. बुमराह आणि सिराज यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि ही 2024 वर्षाची चांगली सुरुवात आहे.”

IND vs SA सामन्यात भारताचा सहज विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी मिळून आफ्रिकन फलंदाजांना घाम फोडला. आफ्रिकेचा पराभव करण्यात या दोन शिलेदारांची महत्त्वाची भूमिका आहे. पहिल्या डावात बुमराहने 2 आणि सिराजने 6 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात बुमराहने 6 आणि सिराजला 1 बळी घेता आला.

यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात केवळ 55 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत आपल्या पहिल्या डावात 153 धावा करू शकला. 98 धावांची आघाडी घेऊन टीम इंडियाने पुन्हा एकदा आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरूंग लावला. दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 79 धावांचे सोपे लक्ष्य दिले होते, जे भारताने अवघ्या 12 षटकांत पूर्ण केले आणि केपटाउनमध्ये प्रथमच कसोटी सामना जिंकला.

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल

Urfi Javed च्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, रुग्णालयातील फोटो व्हायरल