Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने खराब खेळपट्टी बोलणाऱ्यांना सुनावलं आहे. वन डे विश्वचषकातील अंतिम सामन्याचा दाखला देत रोहितने आयसीसीवर देखील टीकास्त्र सोडलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाउनचा सामना अवघ्या दीड दिवसात संपला. त्यामुळे खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने विविध बाबींवर भाष्य केले. तसेच खराब खेळपट्टी बोलणाऱ्यांना रोहितन खडेबोल सुनावल्याचे दिसते.

Rohit Sharma चा संताप

हिटमॅनने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की, या सामन्यात काय घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. मला या खेळपट्टीवर खेळण्यास कोणतीही अडचण आली नाही. जोपर्यंत तुम्ही तोंड बंद ठेवाल तोपर्यंत मला काहीच समस्या नसते. इथे खेळणे आव्हानात्मक होते. कारण खेळपट्टीवर भेगा पडल्या होत्या.

Rohit Sharma ने दिला भारतातील खेळपट्टीचा दाखला

भारतातील कोणत्याही कसोटी मालिकेदरम्यान जेव्हा जेव्हा चेंडू फिरकीपटूला अधिक मदत करतो तेव्हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू खेळपट्ट्यांवर प्रश्न उपस्थित करत असतात. एवढेच नाही तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या खेळपट्टीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.

परदेशी खेळाडूंच्या टीकेनंतर आयसीसीनेही त्या खेळपट्टीला खराब रेटिंग दिले होते. यावर हिटमॅननेही प्रतिक्रिया देताना म्हटले, “भारतात या आणि आव्हानाचा सामना करा. भारतात पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर जेव्हा फेरफटका मारता तेव्हा लोक म्हणतात की खेळपट्टीवरून धूळ उडत आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने शतक ठोकले आणि ती खेळपट्टी खराब असल्याचे आयसीसीने घोषित केले. मला वाटते की, देश पाहून नाही तर खेळपट्टी पाहून रेटिंग द्यायला हवी.”

Rohit Sharma अन् खेळपट्टी वाद

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना दीड दिवसात संपला अन् एकच चर्चा सुरू झाली. खरं तर खेळपट्टीवरून रोहित शर्मा चांगलाच संतापल्याचे दिसले. जोपर्यंत तुम्ही याबद्दल काही बोलत नाही तोपर्यंत मला कोणतीच समस्या नसते, पण हा प्रश्न निर्माण करून मला बोलण्यास भाग पाडले असल्याचेही त्याने सांगितले.

भारताने दुसरा सामना सहज जिंकला आणि इतिहास रचला. केपटाउनमध्ये भारतीय संघाला प्रथमच विजय मिळवण्यात यश आले. आफ्रिकेने पहिल्या डावात अवघ्या 55 धावा केल्यानंतर भारतीय संघ 153 धावांत सर्वबाद झाला. मग 98 धावांची आघाडी घेऊन भारत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात गेला. यजमान संघाने आपल्या दुसऱ्या डावात 176 धावा करून भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा टीम इंडियाने सहज पाठलाग करून विजय मिळवला.

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल