Tourist Places | फिरायला जाण्याचा विचार करताय?; ‘या’ पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tourist Places l भारत हा देश निसर्गासह विविध संस्कृतीने नटलेला आहे. तुम्ही जरमित्र मैत्रिणी व कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर भारतामध्ये कित्येक असे पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता. मात्र फिरायला जाण्याआधी तुम्हाला आकर्षक अशा ठिकाणांची यादी माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात ऐतिहासिक स्थळांपासून ते चकचकीत समुद्रकिनाऱ्यांपर्यंत उल्लेखनीय स्थळे कोणती आहे.

Tourist Places l शिमला , हिमाचल प्रदेश :

हिमाचल प्रदेशची राजधानी असलेले शिमला हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. मध्यभागी टाऊन हॉल आणि हिमालयाचे सुंदर दृश्य यामुळे हा परिसर खूप लोकांना आकर्षित करतो.

शिमल्याच्या खऱ्या वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी व्हाइसरीगल लॉज, क्राइस्ट चर्च आणि गॉर्टन कॅसलला आवर्जून भेट द्या. तसेच शिमल्यामध्ये बर्फाची चादर पसरलेली असते. ती पर्यटकांना आकर्षित करते.

Tourist Places l लेह, लडाख :

लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हा पूर्व जम्मू-काश्मीरमध्ये स्थित आहे. लडाख सुंदर तलाव, बर्फाळ वारे, हिमनद्या आणि वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. लडाखने समकालीन जगापासून आपले वेगळेपण जपले आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पँगाँग सरोवर, त्सो मोरीरी तलाव आणि लेह पॅलेस ही या भागातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. व्हाईटवॉटर राफ्टिंगपासून गिर्यारोहण आणि ट्रेकिंगपर्यंत अशा अनेक गोष्टींचा तुम्ही मनमोहक आनंद घेऊ शकता.

Tourist Places l काश्मीर :

भारतातील सर्वात भव्य ठिकाणांपैकी एक असलेले काश्मीर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते आणि म्हणूनच त्याला “पृथ्वीवरील स्वर्ग” म्हणून संबोधले जाते. हिमालय आणि पीर-पंजाल पर्वतरांगांच्या डोंगररांगांनी वेढलेले सुंदर तलाव, सुबक फळबागा, हिरवेगार मैदान, पाइन आणि देवदारची जंगले यामुळे काश्मीर ओळखले जाते. निसर्गप्रेमी कुटुंबासोबत व मित्र-मैत्रिणींसोबत काश्मीर फिण्याचा प्लॅन करू शकता.

Tourist Places l मुन्नार, केरळ :

मुन्नारच्या आकर्षणामुळे ते भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ बनले आहे. हिरव्यागार चहाच्या शेतांनी सुरेखपणे नटलेले डोंगर म्हणजे एक दृकश्राव्य पर्वणीच आहे. तसेच शांत तलाव, विस्मयकारक बंधारे आणि ओसंडून वाहणारी घनदाट जंगले मुन्नारच्या मोहक आकर्षणात भर घालतात. मट्टुपेट्टी, पेरियावरू आणि नल्लाथन्नी नदीच्या त्रिकोणावर वसलेले हे आकर्षक हायलँड स्टेशन सर्व बाबतीत निसर्गाचा सर्वात मनोरंजक कॅनव्हास आहे यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ

Mobile Theft : फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास ‘या’ टिप्सचा वापर केल्यास होईल फायदा

Wheat Disease l शेतकऱ्यांनो…गहू पिकावर या रोगांचा होऊ शकतो प्रादुर्भाव; वेळीच सावध राहा

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजना; जाणून घ्या या योजनेचा कोणाला व कसा मिळतो लाभ

Tourist Places : फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या मनमोहक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.