Sharad Mohol ला कोणी मारलं?; देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad mohol) याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू झाला. यानंतर पुण्यात खळबळ माजलीये. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड सुतारदरा या परिसरात हा गोळीबार झाला. या घटनेमुळे पुणेकर चांगलेच हादरले आहेत.

Sharad Mohol | गोळीबाराने पुण्यात खळबळ

पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे. शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र शरद मोहोळच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा पुण्यात गँगवाॅरची चर्चा सुरु झाली आहे. आता या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Sharad Mohol | देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

कोणताही गँग वॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळं गँग वॉर करण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोण होता शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा पुण्यातील एक गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला.

दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Sharad Pawar | शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप; ‘या’ नेत्याने केली मोठी मागणी

Sharad Mohol | शरद मोहोळच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर!

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी Aishwarya Rai ला केलं अनफाॅलो, कारण आलं समोर!

IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी

सर्वात मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू