Manoj Bajpayee ची राजकारणात एंट्री?; म्हणाला, ‘200 टक्के खात्री…’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Bajpayee | ‘द फॅमिली मॅन’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘सिर्फ एक बंदा काफी हे’, अशा धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपटांतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) याचं नाव आघाडीच्या कलाकारांमध्ये घेतलं जातं. चित्रपटसृष्टीतील यशानंतर आता तो आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) नशीब आजमावणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत आहेत. याबाबत सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा आहेत. या चर्चेवर अखेर मनोज बाजपेयी याने स्वतः च स्पष्टीकरण दिलं आहे.

Manoj Bajpayee चा खुलासा

मनोज बाजपेयीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने लिहिलंय की,”हे सगळं काही ठीक आहे. पण, काल रात्री तुम्हाला स्वप्न पडलं होतं काय?, सांगा सांगा., असं म्हणत एकप्रकारे या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

“मला 200 टक्के खात्री आहे की”

सोशल मीडियावर लवकरच मनोज बाजपेयी हा बिहार येथून 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. “मी मागच्या वेळी जेव्हा बिहारला गेलो होतो, तेव्हा मी RJD प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटलो होतो. तेव्हापासून लोक मी राजकारणात येईन असा अंदाज बांधू लागले आहेत. मात्र, मला 200 टक्के खात्री आहे की मी राजकारणात येणार नाहीये,”, असा खुलासा मनोज बाजपेयीने केला आहे. त्यामुळे आता त्याच्या राजकीय एंट्रीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.

‘Killer Soup’ मध्ये झळकणार Manoj Bajpayee

‘गुलमोहर’ या चित्रपटात अगदी शांत भूमिकेत झळकलेला मनोज बाजपेयी लवकरच ‘Killer Soup’या सिरीजमध्ये दिसणार आहे. 2024 मधील Netflix वरील ही पहिलीच ओरिजिनल सिरीज असणार आहे. यामध्ये मनोज सोबत अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा दिसून येणार आहे. याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Rohit Pawar | मोठी बातमी! बारामती ॲग्रोवर ईडीचा छापा; रोहित पवार अडचणीत

Vivo X100 Series l जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Vivo X100 सीरिज लाँच

Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

2024 Bajaj Chetak scooter launched : पॉवरफुल बॅटरीसह चेतक EV स्कुटर लाँच; जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ