Vivo X100 Series l Vivo चा फोन देईल सॅमसंगला टक्कर; ‘हे’ आहेत जबरदस्त फिचर्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vivo X100 Series l Vivo ही नामांकित कंपनी ग्राहकांसाठी जबरदस्त फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच Vivo कंपनीने भारतामध्ये Vivo X100 ची सिरीज लाँच केली आहे. Vivo X100 सिरीजमध्ये कंपनीने Vivo X100 आणि Vivo X100 Pro या दोन व्हेरियंटचा समावेश केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या व्हेरियंट संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात…

Vivo X100 Series l Vivo X100 सीरिज व्हेरियंटचे फीचर्स :

Vivo X100 हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. यामध्ये 12GB RAM आणि 256GB STORAGE व 16GB RAM आणि 512GB स्टोरेजसह लाँच केला आहे.

तसेच Vivo X100 Pro या व्हेरियंटमध्ये फक्त एकच स्टोरेज स्पेसिफिकेशन लाँच केले आहे. Vivo X100 Pro स्मार्टफोनमध्ये 16GB RAM+ 512GB STORAGE सह खरेदी करता येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे तीनही मॉडेल 5G सपोर्ट आहेत.

Vivo X100 Series l Vivo X100 आणि Vivo X100 Pro प्रोसेसर :

कंपनीने लाँच केलेल्या व्हेरियंटच्या प्रोसेसरबद्दल माहिती जाणून घेऊयात. Vivo X100 या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity व 9300 प्रोसेसर सादर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टम देखील असणार आहे.

तर Vivo X100 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर आणि Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टम देखील असणार आहे. त्यामुळे दोन्ही व्हेरियंट अगदी सुसज्ज आहेत.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro बॅटरी क्षमता :

Vivo X100 या मॉडेलमध्ये 5000mAh चा बॅटरी सपोर्ट असणार आहे. तसेच या स्मार्टफोनला 120W चा फास्ट चार्जर असणार आहे. तर Vivo X100 Pro या स्मार्टफोनमध्ये 5400mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जर आहे.

Vivo X100 Series l Vivo X100 आणि Vivo X100 Pro कॅमेरा फीचर्स :

Vivo X100 या स्मार्टफोनमध्ये 50MP मेन + 50MP वाइड अँगल आणि 64MP टेलिफोटो कॅमेरा सादर करण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल आहे.तसेच

Vivo X100 Pro या व्हेरियंटचा मागील कॅमेरा 50MP + 50MP वाइड-अँगल AF आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. तर फ्रंट कॅमेरा हा 32MP चा आहे.

Vivo X100 Series l Vivo X100 सीरिजची किंमत :

Vivo X100 सिरीजची किंमत 63,999 रुपये आहे तर Vivo X100 Pro ची किंमत 89,999 रुपये आहे. तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Vivo च्या अधिकृत साइटवर जाऊन प्रीबुक करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

2024 Bajaj Chetak scooter launched : पॉवरफुल बॅटरीसह चेतक EV स्कुटर लाँच; जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ

Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!