Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon hospital) एका उद्घाटन कार्यक्रमावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांसमोर भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली मारली आहे. पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil kamble) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलं.

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा

ससून रुग्णालयात उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले, त्यांना राग अनावर आला. याबाबत त्यांनी विचारणा केली. यानंतर सुनील कांबळेंनी सातवांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आलं. त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल, असं ते म्हणाले.

ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. सातव यांना मारहाण का झाली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसले.

Ajit Pawar | नेमकं काय घडलं?

ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानाखाली मारली.

जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ

Mobile Theft | फोन चोरीला गेल्यावर करा पहिलं ‘हे’ काम; फोन लगेच मिळेल

Wheat Disease l शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; वेळीच व्हा सावध नाहीतर होईल मोठं नुकसान