Rohit Pawar | मोठी बातमी! बारामती ॲग्रोवर ईडीचा छापा; रोहित पवार अडचणीत

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांवर एक एक संकटे येत आहेत. आमदार रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर (Baramati Agro) शुक्रवारी ईडीने छापा टाकला आहे.

Rohit Pawar | Baramati Agro वर ईडीचा छापा

आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ईडीच्या एका पथकाने कंपनीवर छापा टाकला. ज्यात पाच ते सहा अधिकारी असल्याचे समोर येत आहे. तर त्यांच्याकडून येथे चौकशी केली जात असल्याचे समोर आलं आहे.

मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान ईडीच्या एका पथकाडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड टाकली आहे.

Rohit Pawar यांच्या अडचणी वाढल्या

आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका पथकाने येथे धाड टाकली. यावेळी यात पाच ते सहा अधिकारी होते. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या पथकातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांच्यात वाद झाल्याचंही माहिती समोर आली आहे.

दरमम्यान, याआधी प्रदुषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. तिथे त्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रनेकडून छापा टाकण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

2024 Bajaj Chetak scooter launched : पॉवरफुल बॅटरीसह चेतक EV स्कुटर लाँच; जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ

Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!