Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. सरकार जोवर निर्णय घेत नाही तोवर जरांगे पाटील मागे हटणा नाही, असं स्वतः जरांगेंनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. गावागावात जाऊन जरांगेंनी जाहीर सभा देखील घेतल्या आहेत. त्यांच्या सभेला मराठा बांधव देखील पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगेनी एक निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अद्यापही सरकारने कोणताच निर्णय घेतला नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी यांनी आझाद मैदानाची मागणी केली आहे.

दरम्यान, जालना येथे बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, मैदान मागण्याचा विषय ज्याचा त्याचा आहे. मात्र तिकडे काहीही होऊ, आम्ही मुंबईत जाणार आहोत. शंभूराज देसाई यांचा काही निरोप नाही. परंतु 20 जानेवारीपर्यंत चर्चेसाठी दारं खुली आहेत. 20 तारखेपूर्वी सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. 

जरांगे पाटलांना परवानगी मिळणार?

20 जानेवारीला जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिष्ठ मंडळीने मुंबई पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. शिवाय मुंबई पोलिसांकडे मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनाच्या परवानगीसाठी पत्र व्यवहार देखील केला आहे.

जरांगे पाटील यांनी मुंबईतील आपल्या सर्व समन्वयकांना तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परवानगीसाठी पत्रव्यवहार आणि इतर तयारी देखील आता मुंबईतील समन्वयक करत आहेत.

जरांगेंचं 51 ट्रॅक्टरने स्वागत-

मराठा आरक्षणासाठी जिवाची परवा न करत जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. या सभेत जरांगे पाटील सरकारवर सडकून टिका करत आहेत.

जरांगे यांच्या सभेत लाखो लोक उपस्थित असतात. जरांगे पाटलांची काल कोठाळ गावात सभा झाली. या वेळी त्यांच्या स्वागतासाठी 51 ट्रॅक्टरची रॅली काढत स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला मुंबईतील मोर्चामध्ये येण्याचं आवाहन करत आहेत.

News Title | manoj jarange patil took a big decision

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar | अजित पवारांसमोर राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानाखाली काढला जाळ

Post Office Scheme l पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे गुंतवा मिळेल दुप्पट परतावा

Sridevi च्या मृत्यूबद्दल लेक Janhvi Kapoor चा मोठा खुलासा!

IND vs SA | टीम इंडियाने 91 वर्षे जुना विक्रम मोडला; भारतानं रचला इतिहास

Jacqueline Fernandez अडचणीत; सुकेश चंद्रशेखरची पर्सनल चॅट लीक झाल्याने खळबळ