IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs SA | केपटाउन येथील कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने एका दगडात दोन पक्षी मारले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवून इतिहास रचला. याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) क्रमवारीत देखील भारताला चांगलाच फायदा झाला आहे. आफ्रिकेला त्यांच्याच घरात जाऊन टीम इंडियाने दारूण पराभूत केले. खरं तर केपटाउनच्या मैदानावर प्रथमच भारताला विजय मिळवता आला. या विजयासह भारताने ‘कसोटी’ संपवून अव्वल स्थान गाठले.

IND vs SA भारताची मोठी झेप

भारतीय संघाने WTC च्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह सर्व संघांना पराभूत केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसह फलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताला या क्रमवारीत मोठा फटका बसला होता. मात्र, आता टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची टक्केवारी घसरली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना त्यांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे बरेच नुकसान झाले.

IND vs SA भारत पहिल्या क्रमांकावर

आताच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी 54.16 आहे, तर दक्षिण आफ्रिकेची 50 टक्के अशी घसरण झाली. भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यामधील दोन सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले, तर एक सामना गमवावा लागला आणि एक अनिर्णित राहिला. भारत एकूण 26 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

IND vs SA भारताचा दबदबा

अनुक्रमे भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी असून त्यांची देखील विजयाची टक्केवारी 50 आहे. किवी संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. न्यूझीलंड 12 गुणांसह तिसऱ्या ऑस्ट्रेलिया चौथ्या आणि बांगलादेश पाचव्या क्रमांकावर स्थित आहे.

देश अन् विजयाची टक्केवारी

भारत 54.16%
दक्षिण आफ्रिका 50.00%
न्यूझीलंड 50.00%
ऑस्ट्रेलिया 50.00%
बांगलादेश 50.00%

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे. पहिल्या दोन्ही पर्वांमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, किताबापासून टीम इंडियाला वंचित राहावे लागले. पदार्पणाच्या पर्वात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला.

Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी