Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रो-मान्स’, ही दोस्ती तुटायची नाय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammed Siraj | दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीसमोर यजमानांनी गुडघे टेकले. केपटाउन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर, दुसऱ्या डावात बुमराहने 6 फलंदाजांना चीतपट केले.

Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रोमान्स’

सामन्यानंतर बोलताना या जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिराज आपल्या अप्रतिम खेळीचे श्रेय बुमराहला देताना दिसतो. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मोहम्मद सिराजने त्याच्या खेळीचे श्रेय बुमराहला दिले. तसेच मागील सामन्यात झालेल्या चुकांमधून खूप काही शिकलो असल्याचेही सिराजने सांगितले.

तो म्हणाला, “जसप्रीत बुमराहने चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करण्यास मदत केली. तो मला सतत सांगायचा की, केवळ लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करायची आहे, जास्त काही करण्याची गरज नाही. पहिल्या कसोटीत आम्ही चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करू शकलो नाही, त्यामुळे विरोधी फलंदाजांनी सहज धावा केल्या, पण आम्ही आमच्या मागील चुकांमधून शिकलो. त्यामुळे केपटाउन कसोटीत चांगली गोलंदाजी करू शकली.”

Mohammed Siraj ने बुमराहला दिले श्रेय

तर जसप्रीत बुमराहने सांगितले की, पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज सतत त्याच्या लाईन आणि लेन्थसाठी संघर्ष करत होता. त्यावर मी त्याला चांगल्या लाईनवर सतत गोलंदाजी करण्याची गरज आहे, असा सल्ला दिला. सिराजने दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.

Mohammed Siraj ने सांगितली रणनीती

तसेच मोहम्मद सिराज व्हिडीओमध्ये पुढे म्हणतो की, जसप्रीत मला सामन्याच्या सुरुवातीला सांगतो की कोणत्या लाईन आणि लेन्थने गोलंदाजी करायला हवी, याचा मला खूप फायदा होतो. त्याच्या सांगण्यावरून मी गोलंदाजी केली आणि त्यामुळे संघालाही फायदा झाला आणि मलाही पहिल्या डावात सहा बळी घेता आले. अप्रतिम गोलंदाजीमुळे मोहम्मद सिराजला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. तर, बुमराह आणि डीन एल्गर यांना मालिकावीर घोषित करण्यात आले.

दरम्यान, दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवण्यात भारताला यश आले. अवघ्या दीड दिवसात सामना संपला अन् भारताने प्रथमच या मैदानावर विजय साकारला. दुसऱ्या डावात आफ्रिकेने 176 धावा करून भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा सहज पाठलाग करून भारताने विजय मिळवला.

Winter Driving Tips : दाट धुक्यात गाडी चालवताना या टिप्स फॉलो करा!

Job Alert | पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

श्रीरामाबद्दल Jitendra Awhad यांचं वादग्रस्त वक्तव्य; उदयनराजेंनी केली मोठी मागणी

IND vs SA | ‘मी फ्लाइट पकडली अन् घरी…’, Sachin Tendulkarनं सांगितला भन्नाट किस्सा

Amir khan ने पहिल्या बायकोसमोर केलं दुसऱ्या बायकोला Kiss; व्हिडीओ तूफान व्हायरल