Aishwarya Rai | अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या दोघांचे मतभेद देखील समोर येत आहेत. अभिषेकने मुलाखती दरम्यान त्यांच्यातल्या मतभेदांचा खुलासा केला आहे. तसेच ऐश्वर्या रायने देखील तिचं सासर सोडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता अणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकार?
अभिषेक बच्चने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला. अभिषेक म्हणाला की, माझ्यामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये (Aishwarya Rai) छोट्या मोठ्या कारणावरुन मतभेद होत असतात. मात्र या पलिकडे आम्ही एकमेकांना खूप समजून देखील घेतो. अनेक वेळा ऐश्वर्या मला वेगवेगळे मंत्र देखील देत असते.
ऐश्वर्याने (Aishwarya Rai) सांगितलं की, अफवांना सामोरं कसं जायचं, त्या कशा हँडल करायच्या याबद्दल तिने मला एक महत्वाचा सल्ला दिला होता. ‘अफवा या बदकाच्या पाठीवरून वाहणाऱ्या पाण्यासारख्या असतात. ’त्याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीला सहन करावी लागणारी टीका किंवा नकारात्मकता हे त्यांना मिळणाऱ्या प्रेम आणि कौतुकाच्या तुलनेत नगण्य असतं.
अभिषेक पुढे काय म्हणाला?
अभिषेक पुढे म्हणाला की, टीकेकडे दुर्लक्ष करून जीवनातील सकारात्मक पैलूंवर नेहमी लक्ष दिलं पाहिजे. या अफवांना एखाद्या काळ्या ठिपक्याप्रमाणे मानावं, जो काळा टीका आपल्याला नजर लागू नये म्हणू लावला जातो. त्यामुळे त्याकडे सरळ दुर्लक्ष करावं, असा सल्ला ऐश्वर्याने अभिषेकला दिला होता आणि म्हणून मी आज गप्प आहे.
घटस्फोटावर भाष्य केलं?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.
News Title | abhishek bachchan says I’m silent because of aishwarya rai
महत्त्वाच्या बातम्या-
मृत्यूनंतर Sharad Mohol चं राजकीय कनेक्शन समोर!
Manoj Bajpayee ची राजकारणात एंट्री?; म्हणाला, ‘200 टक्के खात्री…’
Sharad Mohol ला कोणी मारलं?; देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Sharad Pawar | शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप; ‘या’ नेत्याने केली मोठी मागणी