Deepika Padukone | ‘ओम शांती ओम’ नाही तर ‘हा’ होता दीपिकाचा पहिला चित्रपट

Deepika Padukone | बॉलीवूडची ‘मस्तानी’ अर्थातच अभिनेत्री दीपिका पदुकोन (Deepika Padukone)आज (5 जानेवारी)आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘रामलीला’, ‘पद्मावत’, बाजीराव मस्तानी’ ते ‘ये जवानी हे दिवानी’, अशा सुपरहिट चित्रपटांतून आपली छाप सोडणाऱ्या दीपिकाने फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या हिंदी चित्रपटातून नव्हे तर एका कन्नड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे.

कन्नड चित्रपटातून Deepika Padukone चा फिल्मी दुनियेत प्रवेश

2006 साली हिमेश रेशमिया याच्या ‘नाम है तेरा-तेरा’ या गाण्यात प्रथम फराह खान हिने दीपिकाला बघितले होते. त्यानंतर फराहने दीपिकाला ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, ओम शांत ओम पूर्वी तीने कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ या चित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. त्यामुळे तीच्या करिअरची सुरुवात खरी तर, कन्नडमधूनच झाली आहे.

दीपिका जेव्हा ८ वर्षांची होती तेव्हाच तीने जाहिरातीमधून काम करण्यास सुरुवात केली. 2004 साली एका साबणाच्या जाहिरातीनंतर ती प्रकाशझोतात आली. आज दीपिका बॉलीवूड मधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2023 मध्ये तीने पठाण आणि जवान या सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.

भारतात नाही तर ‘या’ देशात झाला Deepika Padukone चा जन्म

5 जानेवारी 1986 मध्ये डेनमार्क येथील कोपेनहेग येथे दीपिकाचा जन्म झाला. 11 महिन्यांची असताना कुटुंबासोबत ती बंगळूरू येथे शिफ्ट झाली. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोन हे प्रसिद्ध माजी भारतीय बॅडमिंटन पटू आहेत.आई उज्वला पदुकोन, बहिण अनिशा असा दीपिकाचा परिवार आहे. त्यांच्या परिवारातील खास गोष्ट म्हणजे या सर्वांच्या नावाचा अर्थ हा ‘प्रकाश’ (light) असा होतो.

2013 मध्ये दीपिकाच्या फिल्मी करिअरला एकदमच झळाळी मिळाली. सुपरस्टार शाहरुख खान सोबत तीचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ , यानंतर संजय लीला भंसाली यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाने तीला चांगलीच हाईप मिळाली. हे सर्व चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरली.

‘या’ चित्रपटांत झळकणार Deepika Padukone

येत्या 25 जानेवारीला रिलीज होणाऱ्या ‘फाईटर’ मध्ये दीपिका (Deepika Padukone) अभिनेता ऋतिक रोशन सोबत लीड रोलमध्ये दिसून येणार आहे. यासोबतच ‘सिंघम अगेन’, ‘कल्कि 2898 एडी’, ‘ब्रह्मास्त्र 2’ , या चित्रपटांतही दीपिका लीड रोलमध्ये असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रो-मान्स’, ही दोस्ती तुटायची नाय!

‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Rohit Pawar | मोठी बातमी! बारामती ॲग्रोवर ईडीचा छापा; रोहित पवार अडचणीत

Vivo X100 Series l जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Vivo X100 सीरिज लाँच

Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!