MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | भारताचा कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी याची लोकप्रियता कमाल आहे. त्याच्या चाहत्यांनी नुकताच त्याच्यासाठी #thalaforareason नावाचा ट्रेंड केला होता, या ट्रेंडसोबतच धोनीचा जर्सी क्रमांक 7 सुद्धा ट्रेंड होताना पहायला मिळाला. आता बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

7 नंबर कुणाला घेता येत नव्हता-

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो 7 क्रमांकाची जर्सी वापरत आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एखाद्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा जर्सी क्रमांक पुन्हा एकदा खुला केला जातो.

संघात प्रवेश करणाऱ्या नवीन खेळाडूंना हा जर्सी क्रमांक घेण्याचा अधिकार असतो. महेंद्रसिंग धोनीने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती, तरी सुद्धा अद्याप त्याचा जर्सी क्रमांक नवीन खेळाडूंना उपलब्ध झाला नव्हता तसेच जुन्या खेळाडूंना देखील तो घेता येत नव्हता. आता धोनीच्या जर्सीबाबत बीबीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नेमका काय आहे हा निर्णय?

बीसीसीआयने अद्याप आपल्या खेळाडूंसाठी 7 हा क्रमांक गोठवून ठेवला होता. आता यापुढेही कोणत्याच खेळाडूला हा क्रमांक घेता येणार नाही, कारण बीसीसीआयने आता धोनीचा जर्सी क्रमांत 7 घेण्यास खेळाडूंना बंदी घातली आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) प्रमाणे आता महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक 7 देखील निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सचिन आणि सचिननंतर फक्त धोनी-

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ त्याचा जर्सी क्रमांक 10 निवृत्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय बीसीसीआयने त्यावेळी घेतला होता, त्यानंतर अशा प्रकारचा मान फक्त महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मिळाला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दोनच खेळाडूंबाबत हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे.

जर्सी क्रमांकांचा तुटवडा?

भारतीय खेळाडूंना 1 ते 100 दरम्यानचा कुठलाही नंबर निवडण्याची मुभा असते, मात्र सध्या खेळत असलेल्या कुठल्याही खेळाडूनं तो घेतलेला नसावा. सध्या भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंनी जवळपास 60 च्या आसपास नंबर घेतलेले आहेत, नव्या खेळाडूंसाठी फक्त 30 च्या आसपास नंबर निवडण्याचे पर्याय आहेत. यातही 10 आणि 7 नंबर आता कुणाला  घेता येत नाही. शिवाय वर्षभर संघातून बाहेर राहिल्यानंतरही काही खेळाडूंचे जर्सी नंबर काढून घेतले जात नाहीत, त्यामुळे नव्या खेळाडूंकडे फारच कमी पर्याय असतात. (MS Dhoni’s No. 7 Jersey Retired, This means that no other Indian cricketer will be able to wear this jersey number in the future)

News Title: ms dhoni 7 number jersey retire by bcci

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका

Lava | महागड्या फोन्सचे सर्व फीचर्स, सध्या अत्यंत स्वस्तात मिळतोय ‘हा’ खतरनाक फोन

Shreyas Talpade | मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका

तारक मेहता मालिकेत सर्वात मोठा बदल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah